CoronaVirus News: देशात सलग दुसऱ्या दिवशीही सापडले ११ हजारांवर नवे कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:19 AM2020-06-15T04:19:15+5:302020-06-15T06:58:09+5:30

साथीचा मोठा फैलाव; एकूण रुग्णसंख्या ३ लाख २० हजारांहून अधिक

more than 11000 new corona patients found in india for 2nd day in a row | CoronaVirus News: देशात सलग दुसऱ्या दिवशीही सापडले ११ हजारांवर नवे कोरोना रुग्ण

CoronaVirus News: देशात सलग दुसऱ्या दिवशीही सापडले ११ हजारांवर नवे कोरोना रुग्ण

Next

नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ११,९२९ नवे रुग्ण आढळून आले, तर ३११ जणांचा बळी गेला. शुक्रवारनंतर सलग दुसऱ्या दिवशीही देशात ११ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख २० हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे आतापर्यंत ९,९१५ जण मरण पावले आहेत. जगामध्ये ७८ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे २१ लाखांपेक्षा जास्तरुग्ण आहेत. ब्राझील दुसºया क्रमांकावर असून तिथे कोरोनाचे साडेआठ लाखांच्यावर तर तिसºया क्रमांकावर असलेल्या रशियामध्ये ५ लाख २० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. भारत हा यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेला भारत चौथ्या क्रमांकावर गेला.

आठवड्यात ७० हजार रुग्ण
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्याच्या परिणामी गेल्या आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत ७० हजार जणांची भर पडली तर दोन हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
या साथीच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत आढावा घेतला होता. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह काही मंत्री व सनदी अधिकारी हजर होते.

Web Title: more than 11000 new corona patients found in india for 2nd day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.