शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी मुख्यालयावर मोर्चाचा प्रयत्न अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 06:21 IST

काश्मिरात निर्बंध; मिरवाईज उमर फारुक, यासीन मलिक स्थानबद्ध

श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत सात नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ बदामी बाग येथील लष्कराच्या चिनार कॉर्पस् मुख्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचा आंदोलकांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी लादलेल्या निर्बंधांमुळे विफल ठरला. हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक यांना सोमवारी पोलिसांनी स्थानबद्धतेत ठेवले आहे.

या परिसरातील सर्व दुकाने, पेट्रोलपंप व अन्य व्यावसायिक आस्थापने बंद होती तर संवेदनशील भागामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुक, मोहम्मद यासीन मलिक यांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. शनिवारच्या चकमकीनंतर फुटीरतावाद्यांनी तीन दिवसांचा बंदही पुकारला होता. त्यामुळे चिनार कॉर्पस् मुख्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी, तसेच पुलवामा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे या भागात लष्करी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नव्हते. सर्वत्र शुकशुकाट होता. या मोर्चात नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले होते. श्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. इतक्या सगळ्या उपाययोजनांमुळे आंदोलकांना मोर्चा काढता आला नाही. (वृत्तसंस्था)सुरक्षा दलावर टीकाहुरियत नेते मिरवाईज उमर फारुक यांनी स्थानबद्धतेस विरोध करून ते आपल्या समर्थकांसह निघीन येथील निवासस्थानातून निघाले व त्यांनी चिनार कॉर्पस् मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव करून मिरवाईज यांना ताब्यात घेतले. त्याआधी पत्रकारांना त्यांनी सांगितले की, सुरक्षा दले ही माणसे मारण्याची यंत्रे बनली आहेत. नागरिक, लहान मुलांना चकमकीत ठार मारून त्यांना दहशतवादी संबोधणे निषेधार्ह आहे.