शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबर महिना अखेरीस इवांका ट्रम्प येणार हैदराबादमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 09:47 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैद्राबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे.

ठळक मुद्दे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैद्राबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे. 28 नोव्हेंबर रोजी हैद्राबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहे

मुंबई, दि. 8- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हैदराबादमध्ये येणार असल्याचं समजतं आहे. 28 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी इवांका ट्रम्प हैद्राबादमध्ये येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या परिषदेला हजेरी लावणार आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2010मध्ये ही परिषद सुरू केली असून यंदाचं परिषदेचं हे आठवं वर्ष आहे. जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी इवांका यांना भारतात येण्यासाठी

निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. मी इवांका यांना भारतात यायचं निमंत्रण दिलं आहे. मला विश्वास आहे की त्या हे निमंत्रण नक्की स्वीकारतील, असं मोदी म्हणाले होते. 

मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून मोदींचे आभार मानले होते. भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी मला भारतात येण्याचं  निमंत्रण दिलं, यासाठी धन्यवाद, असं ट्विट इवांका ट्रम्प यांनी केलं होतं. गेल्या दिड महिन्यापासून या परिषदेसंदर्भात नवी दिल्ली, वॉशिंग्टन आणि हैदराबादमध्ये चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, परिषदेसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू हे तीन पर्याय होते. पण हैदराबाद शहरात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने सगळ्या पायाभूत सुविधा असल्याते त्या शहराची निवड झाल्याचं, सूत्रांकडून समजतं आहे. 

जागतिक उद्योजगता परिषदेचं पहिल्यांदा 2010 साली वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्तंबूल, दुबई, कुआलालम्पूर, मार्राकेश, नैरोबी आणि सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी परिषद पार पडली.  जून 2016मध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 2017 सालाची परिषद भारतात होणार असण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला होता. एका संयुक्त अहवालातून ही माहिती देण्यात आली होती.