शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन झाले महिन्याचे, जगातून मिळेल समर्थन; शेतकरी नेत्यांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:02 IST

Farmers Protest : केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय तातडीने घ्या अन्यथा या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळेल व तुमची (केंद्र सरकारची) फजिती होईल असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते बिंदर सिंह गोलेवाला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या सर्व सीमा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी अडविल्या असून कृषी कायदे मागे घ्यावेत व ‘एमएसपी’ कायदा आणावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबतच शेतकरी प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना कायदे नको आहेत आणि केंद्र सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाहीत. दिल्ली - एनसीआरचे हवामान आरोग्यास अपायकारक आहे. कडाक्याची थंडी आहे. तशाही परिस्थितीत शेतकरी जिद्दीने सीमेवरती बसले आहेत. या एक महिन्याच्या काळात ३५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारतर्फे शेतकरी नेत्यांना दोनवेळा लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेत आणि आम्ही चर्चेला तयार आहोत असे कळविले आहे. परंतु केवळ कायद्यात सुधारणा करू हेच सांगितले जाते. त्यापेक्षा पुढची पायरी चढायला सरकार तयार नाही. 

४८ तासांची वेळ उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर गुरुवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विजय हिंदुस्थानी यांनी स्वत:च्या रक्ताने पोस्टर रंगवले व निदर्शने केलीत. त्यांनी कायदे परत घेण्यासाठी सरकारला ४८ तासांचा वेळ दिला आहे. बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंह यांनी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना समर्थन दिले. त्यांची सेवाही केली. 

रस्ते जामगेला महिनाभर आंदोलनामुळे दिल्लीतील रहदारीचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम होत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी मथुरा आणि आग्रा येथून आलेल्या शेतकऱ्यांना महामाया उड्डाणपुलावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग जाम होता. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप