शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आला रे आला... केरळात मान्सून आला; तामिळनाडू, कर्नाटकाच्या दिशेने कूच, महाराष्ट्रात प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 6:02 AM

पुढील २४ तासांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली: नैऋत्य मोसमी पावसाचे त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा एक आठवडा उशिराने का होईना गुरुवारी भारतात आगमन झाले. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) केल्याने चिंतेचे ढग काहीसे विरळ झाले.

पुढील २४ तासांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, केरळच्या उर्वरित भागांमध्ये तसेच तामिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम मध्य व ईशान्य भागात मान्सून पोहोचणार आहे.

बिपोरजॉय आता पाकिस्तानच्या दिशेने निघाल्यामुळे मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्याचे आयएमडीने गुरुवारी जाहीर केले.

मुंबईत कधी?

मान्सून साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. यंदा १८ जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. कमी अधिक ४ दिवसांचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन १४ ते २२ जूनच्या दरम्यान होईल.

१५० वर्षांत बदलली तारीख

आयएमडी माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख गेल्या १५० वर्षांमध्ये वेगवेगळी राहिली. ११ मे १९१८ रोजी वेळेपेक्षा खूप आधी आणि १९७२ मध्ये १८ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते.    पश्चिम किनाऱ्यावरही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण राहील. मध्य भारतात दुसऱ्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस राहील.  - कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते.

१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलKeralaकेरळ