शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Monkeypox : संकटाची चाहूल! 12 देशांत मंकीपॉक्सचा प्रसार, WHO ने दिला गंभीर इशारा; भारताला कितपत धोका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 18:51 IST

Monkeypox : भारतात अद्यापही मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही पण केंद्र सरकारने यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. 

नवी दिल्ली - कोरोनापाठोपाठ आता जगभरात आणखी एक नवीन आजार अत्यंत वेगाने पसरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे तब्बल 92 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण ब्रिटन, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 12 देशांतील आहेत. भारतात अद्यापही मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही पण केंद्र सरकारने यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. 

मंकीपॉक्सचा प्रसार न झालेल्या देशांमध्ये अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. शारीरिक संबंधांमुळे मंकीपॉक्स माणसांमध्ये पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डेव्हिड हेमॅन यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण होते. आतापर्यंत 12 देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर मंकीपॉक्स महामारी कारण ठरणार का? तसेच याचा भारताला कितपत धोका आहे याबाबत जाणून घेऊया...

चेंबूर येथील जैन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर आणि संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा आजार कांजण्यांसारखा आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर माणसांना त्या विषाणूची बाधा होते. त्यामुळेच हा विषाणू वेगानं पसरतो. विषाणूच्या फैलावाचा वेग 3.3 ते 30 टक्के इतका आहे. कांगोमध्ये या विषाणूच्या संक्रमणाचा दर 73 टक्के होता. मंकीपॉक्सच्या संपर्कात येताच लोकांमध्ये ताप, अंगदुखी, थकवा ही लक्षणं आढळून येतात. तसेच त्रास वाढल्यास चेहऱ्यावर, हातावर त्याचा संसर्ग झाल्याचं दिसून येतं. 

एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस सामान्यत: प्राण्यांमध्ये पसरतो आणि त्यानंतर प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये त्याचा प्रसार होतो. मंकीपॉक्स एचआयव्हीप्रमाणे जेनेटिक असल्याचं सांगितलं. मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांपर्यंत पोहोचतो. मात्र तो महामारीचं रुप घेईल, याबद्दलची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. मात्र यावर संशोधन गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना पाठोपाठ आलेल्या या आजारांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. बायडेन यांनी रविवारी सांगितले की युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या अलीकडील प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज आहे. विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना बायडेन यांनी प्रथमच या आजारावर जाहीरपणे भाष्य केले. हा संसर्ग पसरला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं देखील बाय़डेन यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारत