शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

MonkeyPox in India: मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू; केरळसह दिल्लीपर्यंत आरोग्य यंत्रणा हादरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 11:26 IST

देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. दिल्लीतील रुग्णाच्या स्थितीतही सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. 

केरळच्या एका २२ वर्षीय तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाल्याचा संशय होता. यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

केरळच्या गुरुवायूरजवळील कुरनजीयूरमधील हा तरुण होता. तो संयुक्त अरब अमिरातहून भारतात आला होता. त्याचे नमुने नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठविण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या तरुणाला मंकीपॉक्स सारखे कोणतेही बाहेरील लक्षण नव्हते. मात्र, संशय आल्याने त्याला २७ जुलै रोजी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

दुसरीकडे देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. दिल्लीतील रुग्णाच्या स्थितीतही सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. केरळमधील 22 वर्षीय तरुणाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना त्याला ताप आला आणि तो कोसळल्याची माहिती दिली. सुरुवातीला त्याला मेंदुज्वर झाल्याचा डॉक्टरांना संशय होता. क्षयरोग झाल्याची देखील शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते. शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी सांगितले की, तो यूएईमधील मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यांनी यूएईमधून त्याच्या मित्रांनी पाठवलेल्या एकाच्या चाचणीच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉटही दाखवला होता. स्क्रीनशॉटमध्ये रुग्णाचे नाव आणि तपशील नव्हता. यामुळे डॉक्टरांनी भारतातही त्याच्या चाचण्या घेण्याचा सल्ला दिला होता. 

टॅग्स :Keralaकेरळ