शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बाळाला दूध पाजताना माकडानं पळवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:56 IST

कडानं चक्क आईच्या कुशीतून बाळाला पळवलं आहे आणि त्याला जमिनीवर आपटून मारलं.

आग्रा- उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. लोकांच्या हातातल्या पिशव्या पळवणारं माकड तुम्ही पाहिलंच असेल, परंतु एका माकडानं चक्क आईच्या कुशीतून बाळाला पळवलं आहे आणि त्याला जमिनीवर आपटून मारलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आग्र्यातल्या रुनकता भागात ही घटना घडली आहे. रुनकता भागातच योगेश स्वतःच्या कुटुंबीयाबरोबर राहतात. योगेश हे रिक्षाचालक आहेत. त्यांचं नेहाशी दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. दोघांच्या घरी 12 दिवसांपूर्वीच तान्हा पाहुणा आला होता.नेहा रात्री स्वतःच्या 12 दिवसांच्या बाळाला दूध पाजत होती. त्यावेळी घराचा दरवाजा खुला होता. त्यावेळी एका माकडानं अचानक घरात प्रवेश केला. नेहाला काळी कळण्याआधीच त्यानं बाळाची मान पकडली आणि त्याला उचलून बाहेर घेऊन गेला. नेहाही धावत त्या माकडाच्या मागे पळू लागली. माकड पळत शेजाऱ्याच्या छतावर गेला. नेहाचा आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले. सर्वांनी माकडाला पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माकडानं त्या चिमुकल्याला फेकून पळ काढला. माकडानं मान पकडल्यामुळे बाळाच्या मानेतून रक्तस्राव होत होता. त्याला लागलीच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या बाळाची हत्या करण्याआधी माकडांनी या भागात 14 वर्षांच्या मुलीवरही हल्ला केला होता. तेव्हा त्या मुलीलाही दुखापत झाली होती. पोलीस निरीक्षक अतबीर सिंह यांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनात बाळाच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली. गेल्या काही दिवसांपासून या भागात माकडांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे नागरिक भीतीग्रस्त आहेत.