शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 19:21 IST

CoronaVirus Lockdown पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत.

महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांच्या शासकीय मदतीचा दुसरा हप्ता सोमवारपासून पाठविण्यात येणार आहे. कोरोना संकटामध्ये गरीबांना मदत म्हणून अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्चला घोषणा केली होती. यामध्ये महिलांना त्यांच्या जनधन खात्यामध्ये एप्रिलपासून ५०० रुपये टाकण्यात येणार होते. ४ मे पासून दुसऱ्या महिन्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत. 

वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी याची माहिती दिली आहे. मात्र, हे पैसे खात्यात जमा झाल्या झाल्या काढता येणार नाहीत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. यानुसारच या महिला खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार आहेत. 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी पहिल्या महिन्यात गर्दी उसळली होती. असा प्रकार होऊ नये म्हणून केंद्राने एक वेगळी अट घातली आहे. ही रक्कम पाच दिवस ट्रान्सफर केली जाणार आहे. यामुळे आपोआपच सोशल डिस्टन्स पाळला जाणार आहे. 

काय आहे प्लॅन...

  •  ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ० किंवा १ आहे त्यांना ४ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत. 
  •  ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक २ किंवा ३ आहे त्यांना ५ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत. 
  •  ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ४ किंवा ५ आहे त्यांना ६ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत. 
  •  ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ६ किंवा ७ आहे त्यांना ८ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत. 
  •  ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ८ किंवा ९ आहे त्यांना ११ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत. 
  • ११ मे नंतर कोणीही पैसे काढू शकणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

टॅग्स :prime ministerपंतप्रधानcorona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन