शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

काश्मीरमधील दगडखोरांना पाक पुरवतो पैसा, फुटीरतावादी नेत्याचे धक्कादायक खुलासे

By admin | Updated: May 16, 2017 22:42 IST

काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवून तरुणांची माथी कशा प्रकारे भडकावली जातात

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - काश्मीर घाटीमध्ये अशांतता पसरवून तरुणांची माथी कशा प्रकारे भडकावली जातात, काश्मीरमधील दगडखोरांना पाक कसा पैसा पुरवतो, याचे फुटीरतावादी नेत्याने केलेले धक्कादायक खुलासे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आले आहेत. एका व्हिडीओमध्ये फुटीरतावादी संघटना असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता कशा प्रकारे पाकिस्तान हवालामार्फत फंडिंग करतो हे स्वीकारत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. स्टिंगमध्ये दगडफेक, शाळेतील जाळपोळ आणि आमदारांवरील हल्ल्यांसंदर्भातही मोठे खुलासे करण्यात आले आहेत.  
इंडिया टुडेच्या स्टिंगमध्ये एक फुटीरतावादी नेत्यानं पाकिस्तान हवालामार्फत कोटी रुपयांचा निधी देत असल्याचं कबूल केलं आहे. दुबई आणि सौदी अरेबियातून काश्मीरमध्ये कशा प्रकारे पैसा पाठवला जातो, याचीही माहितीही या स्टिंगमध्ये फुटीरतावादी नेत्यानं दिली आहे. फुटीरतावादी नेत्याशी इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं निधी देणा-या व्यक्तीच्या स्वरूपात बोलणी केली. रिपोर्टरशी बोलण्यासाठी दिल्लीत आलेल्या सय्यद शाह अळी गिलानीच्या हुर्रियत कॉन्फ्रेन्सचे नेते नईम खान यांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. रिपोर्टरनं काश्मीरमध्ये सरळ पैसा आणला जात असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यानं निधीचं सर्व काम दिल्लीतून होत असतं. तसेच भारत-पाक सीमेच्या रस्त्याद्वारे छोट्या स्वरूपातही निधी प्राप्त होतो. मात्र सर्व मोठा निधी हा दिल्लीतूनच येत असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. रिपोर्टरनं फंडिंग हवालामार्फत होत असल्याचं विचारल्यानंतर नईम खान म्हणाला, सर्व काम दिल्लीतील बल्लीमारन आणि चांदनी चौकातून होते. अशा प्रकार भारतात हवाल्याचा काम होतं आणि आम्ही त्याचा एक भाग आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना कॅशलेस फंडिंग देत असल्याचंही स्टिंगमधूनच समोर आलं होतं. पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक ट्रक मुजफ्फराबादच्या श्रीनगरमध्ये येत-जात असतात. या ट्रकमधूनच पैसा पाठवला जात असल्याचंही नईम खान यांनी सांगितलं आहे. फुटीरतावादी नेत्यांच्या समर्थनाशिवाय काश्मीरमध्ये शाळेत तोडफोड, जाळपोळ होत नसल्याचेही धक्कादायक खुलासे केले आहेत.