शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनी लाँड्रिंग: पुष्पक बुलियनची मालमत्ता जप्त, २१ कोटी ४६ लाखांची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:49 IST

सोने बाजारातील प्रसिद्ध पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पटेलला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : सोने बाजारातील प्रसिद्ध पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पटेलला अटक करण्यात आली आहे.ईडीने पुष्पक बुलियनची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली. तसेच या प्रकरणातील पाच आरोपींच्या १२ ठिकाणांवर छापे टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. नोटाबंदीच्या काळात पुष्पक बुलियनच्या चंद्रकांत पटेलने मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर केल्याचे समोर आले. याप्रकरणी अवैधरित्या पैसे बाळगल्याप्रकरणी ईडीनेही मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याअंतर्गत पुष्पक बुलियनवर कारवाई केली. यावेळी जवळपास ८४.५ कोटी रुपयांच्या काळ्या धनाची सोने खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.पीहू गोल्ड आणि सतनाम ज्वेलर्सच्या नावाने उघडलेल्या दोन शेल कंपनीच्या खात्यातून ही रक्कम पुष्पक बुलियनच्या खात्यात जमा झाली होती. त्याद्वारे २५८ किलो गॅ्रम सोन्याची खरेदी झाल्याचे दाखविण्यात आले होते. शेल कंपनीचे संचालक बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.ही कारवाई झाल्यानंतर ईडीने पुढील तपास सुरू केला आहे़२१ कोटी ४६ लाखांची संपत्ती -याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी दोन बँक अधिकारी आणि तीन व्यापाºयांविरूद्ध दोन शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता़ त्या चौकशीदरम्यान पुढील माहिती उघडकीस आली़ त्यानंतर ईडीने पुष्कक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली़

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयpushpak bullionपुष्पक बुलियन