शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

क्षण अभिमानाचा ! 'चांद्रयान 2' मोहिमेचं नेतृत्व करतेय 'रॉकेट वुमन रितु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:29 IST

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे.

नवी दिल्ली - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाच देश ठरणार आहे. जगाचे लक्ष लागलेल्या या चांद्रयान 2 मोहिमेचं नेतृत्व एक महिला करत आहे. त्यामुळे महिलाशक्तीचाही अभिमान या मोहिमेसह जोडला गेलेला आहे. 

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि विशेषत: लखनौवासियांसाठी हा क्षण अत्यानंदाचा असेल. कारण, इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लखनौ कन्या रितु करिधाल श्रीवास्तव या मिशन चांद्रयान 2 च्या डायरेक्टर आहेत. मला नेहमीच ग्रह-ताऱ्यांचं आकर्षण राहिलं आहे. ताऱ्यांनी मला नेहमीच आपल्याकडे ओढलं आहे. अवकाशातील त्या अंधाऱ्या जगात काय असेल? याची उत्सुकता मला बालपणापासून होती. त्यामुळे विज्ञान हे माझ्यासाठी केवळ विषय नसून एक जुनून असल्याचे रितु करिधाल यांनी म्हटलं आहे. रितु यांनी इस्रोमध्ये अनेक महत्त्वांकाक्षी प्रकल्पांवर काम केलं आहे. चांद्रयान 2 या मोहिमेकडे जगभराचे लक्ष लागले असून देशातील 130 कोटी भारतीयांचाही उत्साह या प्रकल्पासोबत जोडला गेला आहे. आमच्याजवळ कुठलाही अनुभव नव्हता, पण सर्व शास्त्रज्ञांची टीम दिवस-रात्र मेहनत घेत होती. त्यांच्या अनुभवातूनच आम्हे हे मिशन करुन दाखवलं, असेही रितु यांनी सांगितलं. 

रितु या लखनौच्या राजाजीपुरम येथील रहिवासी आहेत. रितु यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचे भाऊ रोहित यांनी आपल्या बहिणीचा अभिमान असल्याचे म्हटले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन रितु यांनी केले आहे. 

रितु करिधाल श्रीवास्तव : - लखनौ विश्वविद्यालयातून फिजिक्स विषयात पदवी संपादन.इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. येथूनच एअरोस्पेस इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. 1997 साली इस्रोमध्ये नोकरीला सुरुवातमंगलयान मध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळलाचांद्रयान 2 मध्ये मिशन डायरेक्टर

अभिमानाची बाब देशासाठी अद्भूत क्षण असून चंद्रावर यान पाठविणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. लखनौच्या कन्येच्या नेतृत्वात ही कामगिरी होत असल्याचा अभिमान आहे. डॉ. अलोक धवन, डायरेक्टर IITR 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो