शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:56 IST

Mohan Bhagwat on RSS 100 years: 'सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत, आपण एकत्र राहू शकतो. तुम्ही विनाकारण का लढताय?'

Mohan Bhagwat on RSS 100 years:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत आयोजित 'संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज' या कार्यक्रमात बोलताना हिंदू राष्ट्र, राष्ट्रीय एकता, विविधता आणि जबाबदारी अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, 'जेव्हा आपण हिंदू राष्ट्र म्हणतो, तेव्हा कोणाला तरी सोडून जात आहोत. हे योग्य नाही. आपण कोणाच्याही विरोधात नाही आहोत.' 

भागवत म्हणतात, 'जेव्हा आपण हिंदू राष्ट्राबद्दल बोलतो, तेव्हा लोक प्रश्न उपस्थित करतात. आपला देश आधीपासून अस्तित्वात आहे. हिंदू हा शब्द काढून टाकला, तरी देशाचा विचार केला पाहिजे. हिंदू राष्ट्र म्हणजे कोणालाही वेगळे करणे नाही. जर आपण हिंदू राष्ट्र म्हटले, तर आपण कोणाला तरी सोडून जात आहोत, ते योग्य नाही. आपण कोणाच्याही विरोधात नाही,' असे मोहन भागवत म्हणाले.

बाहेरील लोकांनी 'हिंदू' नाव दिले ते पुढे म्हणतात, 'हिंदू नाव आपल्याला बाहेरील लोकांनी दिले. आपण कधीही मानवांमध्ये भेदभाव केला नाही. आपल्या देशात अनेक धर्म होते, पण प्रत्येकाचा स्वभाव स्वीकारणाऱ्याला हिंदू म्हटले जात असे. इतरांच्या श्रद्धेचाही आदर करावा, त्याचा अपमान करू नये. सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत, आपण एकत्र राहू शकतो, तुम्ही विनाकारण का लढताय?'

हिंदू विरुद्ध सर्व नाही आरएसएस प्रमुखांनी स्पष्ट केले की, 'हिंदू असणे म्हणजे इतरांविरुद्ध उभे राहणे नाही. हिंदू विरुद्ध सर्व कधीच नसते. हिंदूचा स्वभाव समन्वयात आहे, संघर्षात नाही. आपल्या देशातही धर्मांतरित मुस्लिम आहेत. सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत आणि प्रत्येकाचे मूळ एकच आहे. म्हणून समाजाने भांडण्याची गरज नाही. जे स्वतःला हिंदू म्हणवतात, त्यांनी प्रथम आपले जीवन चांगले आणि सुव्यवस्थित बनवावे.' 

डीएनए आणि अखंड भारत...'गेल्या ४०,००० वर्षांपासून भारतातील लोकांचा डीएनए सारखाच आहे. भारत आधीच अविभाजित आहे आणि विविधतेत एकता ही त्याची खरी ताकद आहे. एकजूट राहण्यासाठी सर्वांनी समान कपडे घालावेत किंवा समान विचारसरणी बाळगावी लागेल, असे आम्हाला वाटत नाही. हे विविधतेत एकतेचे एक रूप आहे. फक्त सरकार किंवा एखाद्या पक्षाला जबाबदार धरता येणार नाही. देशाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,' असेही भागवत यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतdelhiदिल्ली