शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

"मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले"? बिशप भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:44 IST

भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे...

भारतात कॅथोलिक समाजाच्या सर्वोच्च संस्थेने गुरुवारी धर्मांतरण आणि आदिवासी समाजाशी संबंधित सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानावर प्रश्न उपस्थित केला आहे. भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. ‘कॅथोलिक बिशप्स कॉन्फ्रेंस ऑफ इंडिया’ने (सीबीसीआय) गुरुवारी त्यांच्या या विधानावर टीका केली.

काय म्हणाले होते भागवत? -टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, भागवत सोमवारी इंदूरमध्ये एका भाषणात म्हणाले, "जेव्हा संसदेत 'घर वापसी' मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता, तेव्हा आपण देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली होती. तेव्हा इतर धर्मातून हिंदू धर्मात परतणाऱ्या लोकांसंदर्भात देशभरात जबरदस्त चर्चा सुरू होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, "आपण हे काय करत आहात? यामुळे वाद निर्माण होतो. कारण हे राजकारण आहे. जर मी राष्ट्रपती नसतो आणि काँग्रेस पक्षात असतो, तर मीही संसदेत विरोध करताना दिसलो असतो. 

पुढे बोलताना भागवत म्हणाले, "यानंतर प्रणब मुखर्जी बोलले की, 'पण आपण जे काम केले आहे, त्यामुळे 30 टक्के आदिवासी...' त्यांना काय बोलायचे होते ते मला समजले आणि मी खूश झालो. यावर मी म्हणालो, '...(अन्यथा) मी ख्रिश्चन झालो असतो?' यावर ते म्हणाले, 'ख्रिश्चन नव्हे, राष्ट्र-विरोधी'". 

या संदर्भात, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या नावाने बनावट वैयक्तिक संभाषण आणि संशयासंपद विश्वसनीयता असलेल्या संघटनेच्य निहित स्वार्थाने मरणोत्तर बोलणे, छापणे एक महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. 

डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना का बोलले नाही?"डॉ. प्रणब मुखर्जी हयात असताना मोहन भागवत का बोलले नाही? त्यांचा हेतू वाईट, भयावह आणि अवास्तविक असल्याचे दिसते. हे वक्तव्य खरे असेल आणि माजी राष्ट्रपतींनी असे काही म्हटले असेल, असे आम्हाल वाटत नाही. आम्ही राष्ट्राप्रति असलेले त्यांचे योगदान आणि मातृभूमीच्या बहुलवादी धर्मनिरपेक्षतेच्या त्यांच्या आदरयुक्त विचारांचा आदर करतो. 'गेल्या अनेक दशकांपासूनच्या हिंसक भारतीय इतिहासाशी संबंधित असलेल्या तीन वेळा बंदी घातलेल्या संघटनेला, अहिंसक, शांतिप्रिय आणि सेवाभावी ख्रिश्च समाजाला राष्ट्र-विरोधी म्हणण्याची सूट आहे,' हे दुर्देवी आहे," असेही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी