शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या अडीच वर्षाच्या मुलीची चिंता, मुलाखतीदरम्यान मोहम्मद शामी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 21:47 IST

अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना शामी भावूक झाला.

मुंबई- क्रिकेटर मोहम्मद शामी विरोधात त्याची पत्नी हसीन जहांने मोर्चा उघडला आहे. पत्नीच्या या सर्व आरोपांवर मोहम्मद शामीने उत्तरं दिली आहेत. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शामीने पत्नीच्या आरोपांवर स्षष्टीकरण दिलं. इतकंच नाही, तर एका प्रश्नाचं उत्तर देताना शामी भावूकही झाला. त्याच्या अडीच वर्षांच्या मुलीविषयी बोलताना शामी भावूक झाला. सर्व वादानंतरही सर्व काही ठीक होईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. 

मी जेव्हाही पत्नीने केल्या आरोपांबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. मला तिला सुरक्षित ठेवायचं आहे. तिच्या भविष्याची खूप चिंता आहे. ती फक्त अडीच वर्षांची आहे. तिच्यासाठी सगळं काही सुरळीत करण्याची माझी इच्छा आहे, हे बोलताना मोहम्मद शामीच्या डोळ्यात अश्रृ आले. 

'वाद एवढा वाढलाय, नात्यातलं अंतर एवढं वाढलंय, की काहीजण या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. हे आमचं खाजगी प्रकरण आहे. जो काही गैरसमज असेल, तो संवादाने सुटला पाहिजे. जी घरातली गोष्ट हसीनने बाहेर आणली आहे, त्याने लोकांमध्ये हसं झालं आहे. असं शमी म्हणाला.

माझ्या व पत्नीमधील वाद बाहेर न जाता घरातच सोडविण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. माझी मुलगी, पत्नी आणि कुटुंबांची अब्रू घरातच रहावी. मुलीच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा वाद घरातच रहावा, अशी इच्छा आहे,असं मत शामीने व्यक्त केलं. हसीन जहां शामीवर करत असलेल्या आरोप प्रकरणात इतर कुणाचा तरी हात असल्याची शंकाही शामीने व्यक्त केली आहे. 'घरातला वाद तेव्हाच बाहेर निघतो, जेव्हा त्याच्या मागे कुणाचा हात असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असेल, शेवटच्या दिवसापर्यंत करत असेल, मात्र अचानक दोनच दिवसात एवढा मोठा बदल होतो. हे तिचं काम असू शकत नाही, तिचं कुणीतरी ब्रेनवॉश केलं असावं, असंही शामीने म्हंटलं. 

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामी