शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

मोहम्मद शमीच्या पत्नीने मागितली तब्बल एवढी पोटगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 4:08 PM

भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या त्याच्या पत्नीने आता पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा तब्बल...

कोलकाता - भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या त्याच्या पत्नीने आता पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा 10 लाख रुपये एवढी पोटगी मिळण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, शमीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात अलीपूरच्या तिसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी  शमी आणि अन्य आरोपींना समन्स मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हसीन जहाँनचे वकील झाकीस हुसैन यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, दंडाधिकाऱ्यांनी आमची याचिका ऐकून दुसऱ्या पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. हसीन जहाँ मंगळवासी सकाळी कोर्टात आली. त्यानंतर तिने पती मोहम्मद शमी, त्याची आई अंजुमन आरा बेगम, बहीण सबीना अंजून, भाऊ मोहम्मद हबीब अहमद आणि हबीबची पत्नी शमा परवीन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली."शमी हा दरवर्षी सुमारे 100 कोटींची कमाई करतो. त्यामुळे हसीन जहाँसाठी पोटगी देण्यात त्याला अडचण येऊ शतक नाही. कुटुंबाची काळजी घेणे हे शमीचे कर्तव्य आहे. त्यामुळे दहमहा सात लाख रुपये आणि मुलांसाठी तीन लाख रुपयांची मागणी आम्ही केली आहे, असेही वकिलांनी पुढे सांगितले. मोहम्मद शमीवर झालेल्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी अमरोहा या शमीच्या गावी जाऊन चौकशी केली होती. मात्र अद्याप शमीची चौकशी करण्यात आलेली नाही.  आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत हसीन जहाँनने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले होते.   

टॅग्स :Courtन्यायालयMohammad Shamiमोहम्मद शामीCricketक्रिकेट