शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

मोहाली MMS कांड: वॉशरूमला जायलाही घाबरत आहेत मुली, पोलीस शोधणार छुपे कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:32 IST

चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

चंदिगड: चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या एका तरुणीने 60 हून अधिक तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS लीक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हे MMS कांड उघडकीस आल्यानंतर आता विद्यार्थिनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील वॉशरूम वापरण्यासही घाबरत आहेत. तसेच, अनेकजणी आपापल्या घरी परतत आहेत. आरोपी तरुणीने इतर तरुणींचे व्हिडीओ बनवून तिच्या प्रियकराला पाठवले. यातील काही व्हिडीओ सोशल मीडिया आणि पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

पोलिसांनी आरोप फेटाळलेदरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले असून, मुलीने फक्त तिचाच व्हिडिओ बनवून प्रियकरासोबत शेअर केल्याचे म्हटले आहे. आरोपी तरुणीच्या मोबाईलमधून इतर कोणत्याही विद्यार्थ्यींनीचा व्हिडीओ सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, चुकीची माहिती कॅम्पसमध्ये पसरल्यामुळे सर्व विद्यार्थी घाबरले आणि विरोध केला.

पोलीस छुपे कॅमेरे शोधणारगेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठात तरुणींचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता त्यांना कॅम्पसमधील वॉशरूम वापरण्याचीही भीती वाटत आहे. यादरम्यान पोलीस वसतिगृहातील छुपे कॅमेरे शोधत आहेत. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी, पोलिस खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. त्या विद्यार्थिनीने फक्त स्वतःचा व्हिडीओ बनवून पाठवला असेल तर तिला लॉकअपमध्ये का टाकले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वॉर्डनमुळे वेळेवर कारवाई होत नाहीआंदोलक विद्यार्थ्यानी वसतिगृहाच्या वॉर्डनवरही टीका केली. 'प्रॉब्लेम तुमच्या कपड्यांमध्ये आहे, व्हिडिओ नाही. तुमच्या कपड्यांमुळे मुले अश्लील व्हिडिओ बनवतात', अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या वॉर्डनविरोधात विद्यार्थी आक्रमक आहेत. वॉर्डनमुळे मुलींच्या वसतिगृहातील समस्या विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचल्या नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात एफआयआर नोंदवल्याचे सांगितले.

टॅग्स :Punjabपंजाबuniversityविद्यापीठCrime Newsगुन्हेगारी