शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

टिष्ट्वटरवर मोदींच्या वक्तव्याचा निषेध

By admin | Updated: May 20, 2015 02:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशियाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारतीयांचा अपमान केला, अशा आशयाची विधाने करीत टिष्ट्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशियाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारतीयांचा अपमान केला, अशा आशयाची विधाने करीत टिष्ट्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. चीन आणि कोरियामध्ये भाषण करताना आपण पंतप्रधान होण्यापूर्वी नागरिकांना भारतीय असण्याची शरम वाटायची, असे विधान केले होते. याच विधानाचा टिष्ट्वटरवर समाचार घेतला जात आहे.सततच्या परदेश दौऱ्यांमुळे चर्चेत येणारे पंतप्रधान त्यांच्या तेथील भाषणांमुळेही चर्चेत आणि वादाच्या गर्तेत सापडत आहेत. मॉरिशस असो वा अमेरिका, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील भारतीयांना भेटतात. शांघायमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना यापूर्वी तुम्हाला भारतात जन्मल्याबद्दल लाज वाटायची, मागील वर्षी भारतात नवे सरकार येण्याची इच्छा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बाळगली होती. आता तुम्हाला भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असेल. असे विधान केले होते. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी अशाच आशयाची विधाने द. कोरियामध्ये सेऊल येथे बोलतानाही केली. त्यामुळेच त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.अशी होत आहे टीकापंतप्रधानांच्या विधानांचा निषेध करणाऱ्यांमध्ये राजकीय व्यक्ती, प्रवक्ते, पत्रकार तसेच सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. आम्हाला भारतीय असण्याची कधीच लाज वाटली नव्हती असा सूर या प्रतिक्रियांमध्ये उमटला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा विचार करून परदेशात बोलायला हवे, आता निवडणूका संपल्या आहेत असे सल्लेही त्यांना देण्यात आले आहेत.शब्दांमध्ये अडकले पंतप्रधानवक्तृत्वशैली आणि विविध नव्या उपमा, संज्ञांच्या वापरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे नेहमीच चर्चेमध्ये येतात. मौत का सौदागर या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलल्या टिकेला त्यांनी मी मतोंका सौदागर आहे असे त्यांना म्हणायचे असावे, अशा शब्दांमध्ये टीका परतवली होती. मी पंतप्रधान होताच वर्षभरात परिस्थिती कशी पालटली हे सांगण्याचा प्रयत्न करताना मात्र ते आपल्याच शब्दांमध्ये अडकले. आपल्या कारकिर्दीच्या महतीपेक्षा भारतीयांचा अपमानच जास्त झाल्याचा अर्थ लोकांनी घेतला आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला.नरेंद्र मोदी यांनी केवळ १२५ कोटी भारतीयांचा अपमान केलेला नाही, तर आपले आजोबा, पणजोबा, पूर्वज आणि स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान केला आहे-संजय झा. प्रवक्ते, काँग्रेसमी इंग्लंडमध्ये जन्मलो, पण श्रीयुत पंतप्रधान, मला भारतीय पारपत्र दाखवताना कधीही लाज वाटली नाही.- ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री