शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: April 25, 2016 03:54 IST

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला. आपण पाण्याबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. पाणी बचत ही लोकचळवळ बनली पाहिजे. जलसंवर्धनामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढेल आणि त्यासोबतच कृषी विकास होईल आणि जीडीपीमध्ये वृद्धी होईल. या दृष्टीने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मोदी यांनी केले.‘कितीही संकटे आली तरी एखादी गोड बातमी कानावर पडली की, सर्व संकटांचे निराकरण झाले, असे माणसाला वाटू लागते. हा मनुष्यस्वभाव आहे. यंदा मान्सून १०६ ते ११० टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविणारी माहिती सार्वजनिक झाल्यापासून एखादा मोठा शांतिसंदेश आल्यासारखे वाटू लागले आहे. अद्याप पाऊस पडायला वेळ आहे; परंतु चांगला पाऊस पडणार ही बातमीदेखील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे,’ असे मोदी म्हणाले.यंदा भीषण उष्णतेने आनंदात विरजण घातले आहे. देश चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यातच दुष्काळ पडल्याने चिंता वाटते. सतत दुष्काळ पडल्याने जलसाठे कोरडे पडतात. अनेकदा विविध कारणांमुळे जलस्रोत आटतो. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारने प्रयत्न तर केलेच पाहिजेत; परंतु नागरिकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याबाबत जागृती दिसते. लोकांना पाण्याचे मूल्य कळले आहे, असे मोदी यांनी सांगितले.>शिक्षणात गुणवत्ता हवी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात शिक्षणाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले पाहिजे, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावातील लोकांनी पाणी बचतीसाठी केलेले प्रयत्न आणि पिकांच्या पॅटर्नमध्ये केलेला बदल याचा मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या शर्मिला धारपुरे हिने फोनवर चिंता व्यक्त केली होती, त्याचा उल्लेख करून मोदी पुढे म्हणाले, शर्मिलाची चिंता उचित आहे. पाल्यांना चांगले शिक्षण देणे हेच प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या विकासासाठी अधिक जनजागृती व्हायला पाहिजे.गावकऱ्यांनी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.>ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रम राबविल्याबद्दल राज्य सरकारांसह सर्व पक्षांचे आभार व्यक्त करून मोदी म्हणाले की, ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी आहे. आपले सरकार ग्राम उदयवर जोर देत राहील. हा कार्यक्रम गावाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एका संधीच्या रूपात परिवर्तित केला पाहिजे.