शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभास्थळी दीड महिन्यांपासून बॅरिकेडस् पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:54 IST

बेफिकीर पोलिस यंत्रणा : रस्त्यावर अपघाताची शक्यता

ठळक मुद्देबरेच बॅरिकेडस रस्त्यावर येऊन पडल्याने अपघातही होण्याची भीती

पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणेला त्यांनी सभास्थळी टाकलेले बॅरिकेडस् उचलून नेता आलेले नाही. त्यामुळे सदर बॅरिकेडस् अस्ताव्यस्त पडले असून काही चोरीलाही गेल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहीर सभा झाली होती. या सभेची सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सदर विशाल जागेत सापांचा वावर असल्याने पोलिस प्रशासनाने सर्पमित्रांची फौज तैनात केली होती शिवाय, पंतप्रधानांची सभा म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाय योजिले होते. मोदींच्या सभेआधीच पाच दिवस शेकडो लोखंडी बॅरीकेट लावण्यात आले होते. सदर बॅरिकेडस् जिल्हा भरातून आणण्यात आले होते. मात्र आता सभा होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी सभास्थळी सदर बॅरिकेडस् बेवारस स्थितीत पडून असून पोलिस यंत्रणेला ते अद्याप उचलून नेण्यात वेळ मिळालेला नाही. त्यामुळे बरेच बॅरिकेडस रस्त्यावर येऊन पडल्याने अपघातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर काही बॅरिकेडस् चोरी होत असल्याचीही चर्चा आहे.अपघातात एकाचा बळीपोलिसांनी सभास्थळी लावलेल्या याच बॅरीकेट मुळे पंधरा दिवसापूर्वी प्रकाश दिवरे या व्यक्तीचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला होता. तरीही पोलीस प्रशासनाने अजुनही बॅरीकेट बाबतीत दखल न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस