शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

मोदींचे सरकार बिल्डर समर्थक

By admin | Updated: May 2, 2015 23:14 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र करीत सरकारने खरेदीदारांऐवजी बिल्डर्सना लाभ मिळवून

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र करीत सरकारने खरेदीदारांऐवजी बिल्डर्सना लाभ मिळवून देण्याकरिता स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरण विधेयकातील तरतुदी शिथिल केल्याचा आरोप शनिवारी केला. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फ्लॅट खरेदी करणाऱ्या अनेक लोकांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्यासमक्ष आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, केवळ शेतकरी आणि आदिवासीच नाही तर मध्यमवर्गीयांचीसुद्धा जमिनीच्या मुद्यावरून पिळवणूक होत आहे. सुट्यांवरून परतल्यापासून काँग्रेस उपाध्यक्षांनी भूसंपादन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. आता फ्लॅट खरेदी करणाऱ्यांच्याही पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लोकांना एका ठराविक तारखेला फ्लॅटचा ताबा दिला जाईल, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे फ्लॅट मिळत नाही. बऱ्याचदा फ्लॅटचा सुपरडुपर एरिया फार जास्त दाखविला जातो; पण बांधकाम झाल्यानंतर वेगळेच चित्र असते. अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अजय माकन यांनीही रालोआ सरकारवर टीकास्त्र सोडताना संपुआ सरकारने आणलेल्या स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरण विधेयकात ११८ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, त्यापैकी बहुतांश बिल्डरांना लाभ मिळवून देणाऱ्या असल्याचा दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)