शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचे तीन आघाड्यांवर ‘लक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:33 IST

२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. विशिष्ट क्षेत्रे निश्चित करून त्यासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्यक्षेत्रासाठीची आयुष्मान योजना आणि ग्रामीण भागामधील गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढविणे या त्या तीन आघाड्या आहेत.अलीकडेच काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले, दलित संघटनांनी केलेली निदर्शने, उजेडात आलेले बँकिंग घोटाळे, दाखल झालेले अविश्वास ठराव, संसदेत कामकाज न होणे, एनडीएमधून काही घटक पक्ष बाहेर पडणे अशा भाजपाच्या दृष्टीने अप्रिय घटना घडत आहेत. सरकारने केलेली ठोस कामे आगामी निवडणुकीआधी जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, या आघाडीवर मोदींनी लक्ष केंद्रित केलेले आहे.आयुष्मान भारत योजनेवर भरदुसरी आघाडी म्हणजे आरोग्यक्षेत्रासाठी राबविण्यात येणारी आयुष्मान भारत योजना. अशा अनेक योजना असताना आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ठोस काम केल्याचे केंद्राला दाखवून द्यायचे आहे. या योजनेची फळे दिसण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी जावा लागणार आहे.गृहनिर्माण योजनेबाबत समाधानग्रामीण भागात गृहनिर्माण योजना प्रभावीरीत्या राबविणे या तिसºया आघाडीवर मोदींनी भर दिला आहे. या योजनेची आजवरची प्रगती समाधानकारक असल्याचे मोदींचे मत आहे. या योजनेतून जनतेला गृहबांधणीसाठी बँकांकडून सहजतेने कर्जे मिळावीत म्हणून केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElectionनिवडणूक