शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

हाती झाडू घेऊन मोदींचे 'स्वच्छ भारत' मिशन सुरू

By admin | Updated: October 2, 2014 13:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात झाडू घेऊन दिल्लीतील वाल्मिकी वस्तीची सफाई करत 'स्वच्छ भारत'मिशनचा शुभारंभ केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - राजधानी दिल्लीतील वाल्मिकी वस्तीचा परिसर आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साफ केला. गांधीजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाचा नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला. 
राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहून मोदी वाल्मिकी मंदिरात पोचले. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि हे अभियान सुरू झाले. १५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोदींनी या अभियानाची घोषणा करत २०१९ पर्यंत महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 'स्वच्छ भारत मिशन' ही लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत आज २ ऑक्टोबर रोजी देशभरात कार्यरत असलेले केंद्र सरकारचे ३१ लाख कर्मचारी विविध सार्वजनिक समारंभांमध्ये स्वच्छतेची शपथ घेणार आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या लक्षावधी कर्मचारीही या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होणार आहेत.तसेच राष्ट्रपती भवनातील सर्व कर्मचारी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामील होणार असून ते संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसराची स्वच्छता करतील. 
दरम्यान या अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इंडिया गेटे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
काय म्हणाले मोदी?
आज महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री या दोघांची जयंती आहे. शास्त्रीजींच्या 'जय जवान, जय किसान' या घोषणेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत देशातील शेतक-यांनी धान्याची कोठारं भरली होती. शास्त्रीजींप्रमाणेच गांधीजींनीही 'क्विट इंडिया, क्लिन इंडिया' हे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरीही 'स्वच्छ भारताचे' स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता आपण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प करूया. देश स्वच्छ ठेवणे हे फक्त सफाई कर्मचा-यांचे काम नाहीये. देशातील सव्वाशे कोटी जनता हे भारतमातेचे सुपूत्र असून देश स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मीसुद्धा प्रथम या देशाचा पुत्र आहे आणि नंतर पंतप्रधान. त्यामुळे देश स्वच्छ राखण्याची मी आजपासून शपथ घेतो, त्याची सुरूवात मी माझं घर, गल्ली आणि गावापासून करणार आहे.  
अस्वच्छतेमुळे आजार पसरतात आणि त्यानंतर औषधोपचारांसाठी लोकांचे खूप पैसे खर्च होतात, गरिबांना तर ते परवडतही नाही. जर देश स्वच्छ ठेवला तर आपण लोकांचे सहा हजार रुपये वाचवू शकतो. सर्व देशवासियांनी या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे. 
आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नऊ लोकांना आमंत्रण पाठवून त्यांना सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यास सांगितले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता सलमान खान, कमल हसन, प्रियांका चोप्रा, तारक मेहता मालिकेची संपूर्ण टीम, अनिल अंबानी, योगगुरू बाबा रामदेव, काँग्रेस नेते शशी थरूर, मृदुला सिन्हा यांचा समावेश असून त्यांनी आणखी नऊ लोकांना आमंत्रि करावे असे आवाहनही केले आहे. 'एक कदम स्वच्छता की ओर' हा नवा नारा असून आपण स्वच्छ भारतासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि सोशल साईटवरही अभियान करणार आहोत. त्यानंतर 'मी कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही' अशी स्वच्छतेची शपथ मोदींनी विद्यार्थ्यांसिहत सर्व उपस्थितांना दिली. 
 
मोदींचे अभियान कौतुकास्पद, सर्वांनी सहभागी व्हावे- आमिर खान
नरेंद्र मोदींचे 'स्वच्छ भारता'चे हे अभियान कौतुकास्पद असून सर्वांनी या अभियानात सहभागी व्हायला हवे असे मत अभिनेता आमिर खानने व्यक्त केले. मी घरात नेहमी स्वत: साफसफाई करतो. माझ्या कार्यालयातही आम्ही ओल्या कच-याचे खत बनलतो. साफसफाईमुळे परिसतर स्वच्छ राहतो, ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. या अभियानात सहभागी होऊन सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे असे मी आवाहन करतो.