शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या भावाने घेतले रामलल्लाचे दर्शन, शेतकरी आंदोलनाबाबत केले मोठे विधान

By बाळकृष्ण परब | Updated: February 5, 2021 06:30 IST

Pralhad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अचानक अयोध्येत जात रामलल्लांचे दर्शन घेतले.

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अचानक अयोध्येत जात रामलल्लांचे दर्शन घेतले. तसेच हनुमानगढी येथे जात पूजाही केली. यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. शेतकरी आंदोलनाबाबत काही मध्यममार्ग निघावा, अशी सदबुद्धी आंदोलक शेतकरी आणि मोदी सरकारला देवाने द्यावी, असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी गुरुवारी अचानक अयोध्येत येऊन देशातील समस्यांबाबत रामलल्लाच्या दरबारात येऊन प्रार्थना केली. शेतकरी आंदोलनावर तोडगा निघावा आणि कोरोनापासून देशाला मुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, काही दिवसांआधीसुद्धा प्रल्हाद मोदी हे अयोध्येत आले होते. त्यावेळीही त्यांनी राम जन्मभूमीचे दर्शन घेत हनुमानगढी येथे पूजा केली होती.दरम्यान, पूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येत आलो आहे. सध्या भारतासमोर निर्माण झालेली आव्हाने संपुष्टात येऊदेत. मग कोरोना असो वा शेतकरी आंदोलन समाप्त होऊ दे. शेतकरी आंदोलनावर काही मध्यममार्ग निघावा, अशी सदबुद्धी ईश्वराने आंदोलक शेतकऱ्यांना आणि सरकारला द्यावी.प्रसारमाध्यमातील काही वृत्तांनुसार आंदोलन करत असलेले लोक शेतकरी नसल्याचे सरकार आणि जनतेला वाटते. तसेच विरोधी पक्षांच्या इशाऱ्यावर काही जण गोंधळ घालत आहेत. दरम्यान, सरकारने अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी बक्षीसांची घोषणाही केली आहे. मात्र प्रल्हाद मोदी यांनी शेतकऱ्यांचे कौतुकही केले. शेतकरी देशाच्या सन्मानाचा विचार करतो आणि तो असा गोंधळ घालणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFamilyपरिवारFarmers Protestशेतकरी आंदोलन