ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. आडवाणी यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.
' आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक असलेल्या अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायु व उत्तम आरोग्य लाभो. त्यांनी या देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. वैयक्तिकदृष्ट्या मी अाडवाणीजींना खूप शिकलो आहे' असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
दरम्यान मोदींसह इतर भाजप नेत्यांनीही अडवानींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.