मोदींचे वर्तन गांधीजींच्या विचारांशी विसंगत - राहुल गांधी

By Admin | Updated: October 12, 2014 14:43 IST2014-10-12T14:43:16+5:302014-10-12T14:43:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजींच्या विचारांशी विसंगत असलेले वर्तन करतात अशी बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

Modi's behavior is incompatible with Gandhiji's views - Rahul Gandhi | मोदींचे वर्तन गांधीजींच्या विचारांशी विसंगत - राहुल गांधी

मोदींचे वर्तन गांधीजींच्या विचारांशी विसंगत - राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत

रामटेक, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजींच्या विचारांशी विसंगत असलेले वर्तन करतात अशी बोचरी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे सध्या पेव फुटले आहे. मात्र दुर्दैवाने त्यांच्या विचारधारेची पुजा केली जात नाही  असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी दुपारी विदर्भातील रामटेक येथे प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदी आयुष्यभर महात्मा गांधीजींच्या विचारधारेशी विसंगत वर्तन करत आले असून आता तेच महात्मा गांधीच्या समाधीसमोर जाऊन नतमस्तक होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र हा सर्वच क्षेत्रात गुजरातपेक्षा पुढे आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला. सत्तेवर येताच एनडीएने यूपीए सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या योजना बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १०० दिवसांत काळा पैसा आणू असे सांगणा-या मोदींनी आता १०० दिवसांत एक रुपया तरी परत आणला का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: Modi's behavior is incompatible with Gandhiji's views - Rahul Gandhi