गांधीनगर : ‘मोदीजी, ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे तुम्ही म्हणाला होता. जय शहाने भरपूर खाल्ले, आता त्याबद्दल एक वाक्य तरी बोला, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी येथील सभेत पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर हल्ला बोल केला.या वर्षाअखेरीस होणाºया विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने गुजरातमध्ये राजकीय रण पेटले आहे. अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल या ओबीसी तसेच पटेल समाजाच्या नेत्यांनीही काँग्रेसला साथ देण्याचे ठरवल्यामुळे निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आजच्या सभेला प्रचंड गर्दीही दिसून आली. (वृत्तसंस्था)>गुजराती आवाज विकत घेऊ शकत नाहीतुम्ही गुजरातचा आवाज विकत घेऊ शकत नाही. तुम्ही गुजराती माणसाला विकत घेऊ शकणार नाही. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या नेत्यांनी ब्रिटिश महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा.मागील २२ वर्षांपासून गुजरातमध्ये जनतेचे नव्हे, तर पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार आहे. गुजरातच्या जनतेला रोजगार, चांगले शिक्षणहवे आहे. पण भाजपा सरकार ते देण्यात अपयशी ठरले आहे.आंदोलकांना विकत घेण्यासाठी भाजपाचे ५00 कोटी : आंदोलन करणाºयांना विकत घेण्यासाठी भाजपाने ५00 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे, असा आरोप पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या तुमच्या योजना अपयशी ठरल्या, पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली, असा टोमणाही त्यांनी मोदी यांना मारला.
मोदीजी, जय शहाबद्दल एक वाक्य तरी बोला, भरगच्च सभेत राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:47 IST