शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदीजी घाई करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हवीये गळाभेट, पाकिस्तान संदर्भातील ट्विटवरून राहुल गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 08:38 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

ठळक मुद्दे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘घाई करा करा मोदीजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना  पुन्हा एकदा तुमची गळाभेट हवीये’ असा खोचक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या ट्विट करून लगावला आहे. 

दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून कायम निषेध होतो आहे.पण रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ असं ट्विट केलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली तेव्हा ‘भारत आमचा चांगला मित्र आहे’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. तसंच पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणावर अमेरिकेने टीकाही केली. पाकिस्तान येथील सुरक्षा दलाने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून एका अमेरिकन कुटुंबाची सुटका केली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले.  या ट्विटचा आधार घेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशातील राष्ट्राध्यक्षांची भेट घेतात तेव्हा ते त्यांची गळाभेट घेऊन भेट घेतात. त्यावरूनच राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. 

पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी त्यांचं घरच आहे अशा आशयाचं ट्विट याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. तर भारत हा आपला सच्चा मित्र असून पाकिस्तानने या देशातील दहशतवादी कारवायांना लगाम घालावा आणि काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा असेही सल्ले अमेरिकेतर्फे देण्यात आले होते. पण आता पाकिस्तानने अमेरिकन कुटुंबाला सोडवल्यावर ट्रम्प यांनी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत ट्विट करताच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

याआधीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. नुकतंच गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे-मोठे दावे करत असल्याचा मुद्दा उपस्थित करून जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी 2030पर्यंत गरिबांसाठी चंद्राला थेट जमिनीवर आणतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प