'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

By महेश गलांडे | Published: January 29, 2021 10:00 AM2021-01-29T10:00:09+5:302021-01-29T10:01:06+5:30

शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

'Modiji, Adani and Ambani will fill your coffers, but' stomach 'is filled by farmers', tej pratap yadav | 'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

नवी दिल्ली -  शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर, याप्रकरणी चांगलेच राजकारण रंगले असून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केंद्र सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांवर गुन्हेही नोंदविण्यास सुरुवात केली असून आंदोलकांना हटविण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. यावरुन, विरोधक आक्रमक झाले आहेत.  

दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूर सीमेसह इतर सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे.


लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारमधील माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनीही मोदींना लक्ष्य करत टीका केलीय. मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरु शकतील, पण तुमचं पोट देशाचा शेतकरी भरतो, अशी आठवण यादव यांनी करुन केलीय. तसेच, तेजस्वी यादव यांनीही शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकावर टीका केलीय. शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय. आंदोलकांवरील सरकारकडून होणाऱ्या अत्याराचाचीह त्यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केलाय. 

शेतकऱ्यांना धमकावण्यात येतंय - प्रियंका गांधी

दरम्यान, राहुल गांधींच्या आधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले होते. प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत. प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील.
 

Web Title: 'Modiji, Adani and Ambani will fill your coffers, but' stomach 'is filled by farmers', tej pratap yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.