वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी मोदींनी काल मेगा रोड शो करत शक्तिप्रदर्शन केलं होतं. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवस, तारीख आणि योग जुळून यावा, यासाठी काशीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला आहे. 26 एप्रिलला शुभ मुहूर्तावर मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच मोदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काशीतल्या कलभैरवाचं दर्शनही घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना वाराणसी येथे उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरून वाराणसीत उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं. दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो काढून शक्तीप्रदर्शन केलं. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोची सुरुवात झाली. मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुमारे सात किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
कालभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर मोदी भरणार उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 09:17 IST