शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 04:54 IST

रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारतीयांना देशहित सर्वात महत्त्वाचे वाटते, हे त्यातून दिसून आले, असेही ते म्हणाले.‘मन की बात’ या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता नव्या मार्गाने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. देशामध्ये शांतता, सलोखा टिकून राहावा, अशी जनतेची इच्छा आहे. हा निकाल देशातल्या न्याययंत्रणेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधी दिवाळीमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते की, या वादासंदर्भात २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशामधील नागरिकांनी शांतता व सलोखा कायम राखला होता. त्याची पुनरावृत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.‘राजकारणात येण्याची इच्छा नव्हती’नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, राजकारणात येण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. मात्र, या क्षेत्रात आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी मी कायमच उत्कृष्ट कामगिरी बजाविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राजकारणात गेला नसतात, तर कोण झाला असता? असा प्रश्न एका एनसीसी कॅडेटने मोदी यांना ‘मन की बात’ कार्यक्रमात विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. गुगलमुळे सारे संदर्भ चुटकीसरशी मिळत असल्याने आपल्या ग्रंथवाचनाच्या सवयीवर थोडा परिणाम झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRam Mandirराम मंदिर