शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Modi Surname Case: दोषी ठरवण्यापूर्वी कोर्टानं विचारलं, आपल्याला काही बोलायचं? राहुल गांधीं एवढंच म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:50 IST

Rahul gandhi defamation case : यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधीं यांना, याप्रकरणी आपले काय म्हणणे आहे, असे विचारले असता, राहुल म्हणाले...

कर्नाटकातील एका निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी आज सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र राहुल यांना लगेचच जामीनही मिळाला आहे. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधीं यांना, याप्रकरणी आपले काय म्हणणे आहे, असे विचारले असता, राहुल म्हणाले, माझे वक्तव्य राजकीय होते. मी मुद्दामहून तसे बोललो नाही. माझ्या वक्तव्यामुळे कुणाचेही नुकसान झालेले नाही. कमीत कमी शिक्षा सुनावली जावी. मी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत राहीन.

शिक्षेनंतर, राहुल गांधींनी केलं असं ट्विट -सूरत कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर, राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, 'मेरा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधरलेला आहे. सत्य माझा देव आहे. अहिंसा त्याला मिळविण्याचे साधन - महात्मा गांधी'

राहुल गांधींची खासदारकी 1 दिवसाने वाचली - या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने आयपीसीच्या कलम ५०४ अन्वये मानहानीच्या आरोपाखाली दोषी ठरवले. आयपीसीच्या कलम ५०४ मध्ये दोषी आढळल्यास दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. थोड्यावेळाने न्यायालयाने निकालही जाहीर करत राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. नियमानुसार जर एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावली गेली, तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. परंतू राहुल गांधी यांना दोन वर्षेच शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी वाचली आहे. 

जर एक दिवसही अधिकची शिक्षा सुनावली गेली असती, तर राहुल गांधींची खासदारकी जाऊ शकली असती. न्यायालयाने त्यांना जामिन दिला आहे. तसेच न्यायालयाने शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती दिली आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात जाऊ शकणार आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालय