शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

CoronaVirus News : "कोरोनाविरुद्धच्या लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा", भाजपा खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 09:34 IST

CoronaVirus News : पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबद्दलही भाष्य केले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्राला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. (Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless - Subramanian Swamy)

यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. "ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करुन नक्कीच टिकू. आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट आपल्याकडे येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे ठरणार नाही," असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

याचबरोबर, सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करु दिले जात नसल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. "नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. परंतू अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल," अशी अपेक्षा सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी ट्विटद्वारे केली आहे. दरम्यान, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, "कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे".

२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्गभारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, अवघ्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या १ कोटींवरून २ कोटींवर गेली आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनापासून बरे झाले आहेत.

मृतांच्या आकडेवारीत भारताने मेक्सिकोला मागे टाकलेकोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत मेक्सिकोला मागे टाकून तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत २ लाख १८ हजार ९४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ५.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझीलमध्ये ४.०७ लाख लोकांचा मृत्यू आहे. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये २.१७ लाख मृत्यूची नोंद झाली असून हा चौथ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या