शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्या मोदींनीच आता मौन सोडावे; मनमोहन सिंग यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:33 IST

कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत.

नवी दिल्ली : कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या विषयांवर मौन धारण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हल्ला चढविला आहे. मी नेहमी मौन बाळगतो, अशी टीका मोदी सतत माझ्यावर करीत असत. आता स्वत:च्या सल्ल्याची पंतप्रधान मोदी यांनी अंमलबजावणी करावी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला आहे.डॉ. मनमोहन सिंग यांनी एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या मौन धारण करण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे. ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ते काही तरी बोलले, याचे अर्थातच मला समाधान आहे, असा टोलाही माजी पंतप्रधानांनी लगावला आहे.डॉ. सिंग म्हणतात की, मोदी मला बोलण्याचा सल्ला सतत देत असत. आता त्यांनी स्वत:च्या आपल्या सल्ल्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी नियमित बोलायला हवे. दिल्लीमध्ये २०१२ मध्ये निर्भया बलात्काराची घटना घडल्यानंतर आमच्या सरकारने बलात्काराच्या कायदा अधिक कठोर केला होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली.अत्याचारांकडे सरकारचे दुर्लक्षकथुआ बलात्कार प्रकरण मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी अधिक गांभीर्याने हाताळायला हवे होते, असे सांगून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, कदाचित जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाचा त्यांच्यावर दबाव असावा. भाजपाच्या दोन मंत्र्यांनी बलात्काराचे उघडपणे समर्थन केले, याबद्दल टीका करून ते म्हणाले की, महिलांची सुरक्षितता, मुस्लिमांची हत्या व एकूणच देशातील कायदा व सुव्यवस्था याबाबत मोदी सरकार काहीच करताना दिसत नाही. दलितोवरील वाढते अत्याचार ही गंभीर बाब असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.भाजपाचे प्रत्युत्तरभाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी कधीच गप्प राहत नाहीत.ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्याकडे गंभीरपणे पाहिले जाते आणि लगेच कारवाईही केली जाते.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी