शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनला डायरेक्ट चॅलेंज करणारे मोदी जगातील एकमेव नेते - अमेरिकन एक्सपर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 12:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हिताला पहिले प्राधान्य देणारे नेते आहेत. ते आशिया खंडातील अन्य देशांसोबत मिळून चीनचे वर्चस्व, प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्दे. भारताबरोबर तणावपूर्ण संबंध ठेऊन आपल्याला काहीही उपयोग होणार नाही हे चीनला कळून चुकले आहे. डोकलाममध्ये 70 पेक्षा जास्त दिवस भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. 

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हिताला पहिले प्राधान्य देणारे नेते आहेत. ते आशिया खंडातील अन्य देशांसोबत मिळून चीनचे वर्चस्व, प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनला त्याचीच चिंता सतावत आहे.  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मोदींच्या रणनितीची पूर्ण कल्पना असून ते मोदींकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतात असे निरीक्षण  बोनी एस ग्लासर यांनी नोंदवले आहे. 

अमेरिकन तज्ञ बोनी एस यांचा चीनच्या विषयावर गाढा अभ्यास आहे. भारताबरोबर तणावपूर्ण संबंध ठेऊन आपल्याला काहीही उपयोग होणार नाही हे चीनला कळून चुकले आहे. भारताची धोरणे आपल्या हिताच्या आड येणार नाही असे चीनला वाटत होते पण तसे घडले नाही. त्यांचा अंदाज चुकला असे ग्लासर म्हणाल्या. डोकलाममधल्या घडामोडींवर ग्लासर यांचे बारीक लक्ष होते. डोकलाममध्ये 70 पेक्षा जास्त दिवस भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते. 

डोकलाममध्ये रस्ता बांधण्यापासून भारताने चीनला रोखले होते. भविष्याच्या दृष्टीकोनातून चीन भारताकडे एक आव्हान म्हणून पाहतो. भारताचे अन्य देशांबरोबरचे सहकार्याचे जे संबंध आहेत खासकरुन जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकबरोबर दृढ होणा-या संबंधांमुळे चीन चिंतित आहे असे ग्लासर म्हणाल्या. चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणाला ठामपणे विरोध करणारा भारत जगातील एकमेव देश आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याचा किंवा अणवस्त्रांचा चीनला धोका वाटत नाही पण भारताच्या राजकीय धोरणांची चीनला चिंता आहे.

चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताने अन्य देशांबरोबर  दृढ संबंधांवर भर दिला त्याच भारताच्या खेळीमुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. डोकलाम वादात भारताने घेतलेल्या ठोस भूमिकेचा जो निकाल लागला. त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. चीन बरोबर सीमावाद असलेले आशिया खंडातील अन्य देश सुद्धा भविष्यात अशीच भूमिका घेऊ शकतात असे निरीक्षण ग्लासर यांनी नोंदवले. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम