शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

'महान जननायकचा सन्मान', कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर PM मोदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 22:13 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Karpoori Thakur Bharat Ratna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे, तर दुसरीकडे आरजेडीने केंद्रावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पीएम मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपला आनंद व्यक्त केला त्यांच्या कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले. भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांसाठी अभिमानाचा आहे. मागास आणि वंचितांच्या उत्थानासाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमिट छाप सोडली आहे. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख तर आहेच, पण त्यामुळे समाजात एकोपा वाढीस लागेल, असं पीएम मोदी म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायाचे जनक मानले जाणारे कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी कौतुक करून आनंद व्यक्त करतो. कर्पूरी ठाकूर यांनी आयुष्यभर समाजातील गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने अत्यंत मागासलेल्या आणि अत्यंत दलित वर्गाच्या कल्याणासाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा कायदा केला होता. कर्पुरीजी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक सलोखा आणि गरीब कल्याणाच्या कल्पनेला आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली आहे. या निर्णयाबद्दल मी राष्ट्रपती भवनाचे आभार मानतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

नितीश कुमार काय म्हणाले?महान स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. सामाजिक न्याय समृद्ध करणारा हा निर्णय म्हणजे लोकशाही मूल्यांप्रती त्यांची खरी निष्ठा आणि वंचित, शोषित आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला देशवासीयांकडून दिलेली श्रद्धांजली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त करत हा सरकारचा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव म्हणतात...कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करणे हा सामाजिक न्याय चळवळीचा विजय आहे. यावरुन दिसून येते की, सामाजिक न्यायाचे पारंपरिक विरोधक आता पीडीएच्या 90 टक्के लोकांच्या एकजुटीपुढे नतमस्तक होत आहेत. तर, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले की, 13 एप्रिलला मी अमित शहा यांची भेट घेऊन कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. मोदींची गॅरंटीचा अर्थ काय, हे आज सिद्ध झाले आहे. धन्यवाद अमित शाहजी आणि नरेंद्र मोदीजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, असं ते म्हणाले.

आरजेडीटा केंद्रावर निशाणा कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याच्या घोषणेचे राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, केंद्र सरकारने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आहे. हा तोच भाजप आहे जो कर्पूरी ठाकूर हयात असताना शिव्या देत होता. भाजपला वर्षानुवर्षे त्यांची आठवण झाली नाही. आम्ही, आमचे नेते लालू यादव यांनी कर्पूरी ठाकूरजींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी सातत्याने केली आहे. आता निवडणुका जवळ आल्या असताना भाजपला कर्पूरी ठाकूर यांची आठवण येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAkhilesh Yadavअखिलेश यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार