शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मोदी-नितीशकुमार बिहारमध्ये जुगलबंदी

By admin | Updated: July 25, 2015 23:28 IST

पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर आलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोघे शनिवारी काही प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या

पाटणा : पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर आलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोघे शनिवारी काही प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले आणि दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगली. उभय नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना, मोदींच्या दौऱ्याने राजकीय वातावरण आणखी तापले. व्हेटरनरी कॉलेज मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार यांनी राजकारणामुळे राज्याच्या विकासात किती अडसर झाला, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोदींना सात प्रश्नही विचारले. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी राज्याला ५० हजार कोटींवर पॅकेज देण्याचे आश्वासन देऊन मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला.कुमार यांचे नवे सहकारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना कोपरखळी मारताना केंद्रात वाजपेयी सरकारनंतर येथून आलेल्या रेल्वेमंत्र्यांनी काम रखडवले, असे ते म्हणाले. राजकारणामुळे राज्याच्या विकासात किती अडसर निर्माण झाला, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी आताच दिली, याकडे लक्ष वेधून मोदी यांनी सांगितले की, वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात जे प्रकल्प पूर्णत्वास यायला हवे होते त्याला २०१५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. २००४ च्या लोकसभा निवडणुका सहा महिन्यानंतर झाल्या असत्या तर काम तेव्हाच पूर्ण झाले असते, या नितीशकुमारांच्या मताशी मी सहमत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नितीशकुमारांची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. तत्पूर्वी, नितीशकुमार यांनी पंतप्रधानांना अप्रत्यक्षपणे ज्या आयआयटी, पाटणा परिसराचे लोकार्पण ते करीत आहेत त्याचे काम २००८ मध्येच सुरू झाले होते आणि राज्य सरकारने यासाठी ५०० एकर जमीनही दिली आहे. याशिवाय वाजपेयी सरकारने सहा महिन्याआधी लोकसभा निवडणुका घेतल्या नसत्या तर बिहार शरीफ-दनियावा रेल्वेमार्गाचे काम आपण रेल्वेमंत्री असतानाच पूर्णत्वास आले असते, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. कुमार यांनी आज ज्या काँग्रेस आणि राजदसोबत मैत्री केली आहे, त्यांनीच रेल्वे प्रकल्प चालू करण्यास विलंब केला आणि यामागे राजकीय कारण होते, हे मोदींनी इशाऱ्या इशाऱ्यातच सांगितले आणि आपले सरकार बिहारच्या विकासात कुठलेही राजकारण करणार नाही, असे आश्वासन दिले.मुजफ्फरपूरमधील सभेत मात्र मोदींनी नितीशकुमारवर कडाडून टीका केली. त्यांच्यावर बिहारमधील लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही केला. (वृत्तसंस्था)पंतप्रधानांना विचारलेले सात प्रश्न-आपण बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?-अच्छे दिनची प्रतीक्षा केव्हा संपणार?- काळा पैसा परत येणार का?-शेतकऱ्यांना किमान मूल्य देण्याचे आश्वासन कधी पूर्ण होणार?-२०२२ पर्यंत सर्वांना घर, वीज आणि पाणी कसे मिळणार? -निधीशिवाय योजना कशा पूर्ण करणार?-जनधन योजनेतील ७० टक्के खाती निष्क्रिय आहेत. या खात्यांच्या माध्यमाने देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना कधी मदत करणार? आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा डाव - लालूप्रसादपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेने दुखावलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर बिहारमधील लोकांचा अपमान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार व आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा आरोप केला.संजद आणि राजदने राज्याची किती सेवा केली आहे, याची जाणीव येथील जनतेला आहे. मोदी आमच्यापैकी एकाची प्रशंसा करून दुसऱ्यावर टीका करीत आहेत. आमच्यात फूट पाडण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसून येतो.मोदींचा बिहार दौरा अपयशी - काँग्रेसकाँग्रेसने पंतप्रधान मोदी यांचा बिहार दौरा अपयशी ठरल्याचा दावा करतानाच, या राज्यातील लोकांना मोदींचा खरा चेहरा माहीत असून ते त्यांच्या भूलभुलय्यात अडकणार नाहीत, असा विश्वास जाहीर केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मोदींचा बिहार दौरा निराशाजनक असल्याचे सांगितले.राज्यात विकासाऐवजी साप आणि विषाचीच चर्चा सुरू आहे. कोण साप आहे आणि कोण नाही. कोण विष पितो आणि कोण पाजतो. हा तुमचा परस्परांमधील प्रश्न आहे. याचा निर्णय चारभिंतीआड झाला पाहिजे. बिहारच्या लोकांना विष प्राशन करण्यास बाध्य करू नका.नरेंद्र मोदी, पंतप्रधान