शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

यंत्रणेला वेग देण्यासाठी मोदींना हवे २० पीए

By admin | Updated: September 14, 2015 01:25 IST

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पंतप्रधान कार्यालय(पीएमओ)हळूहळू मिनी कॅबिनेट बनण्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींच्याच अधिपत्याखालील कार्मिक मंत्रालयाने काढलेली

हरीश गुप्ता, नवी दिल्ली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पंतप्रधान कार्यालय(पीएमओ)हळूहळू मिनी कॅबिनेट बनण्याकडे वाटचाल करीत आहे. मोदींच्याच अधिपत्याखालील कार्मिक मंत्रालयाने काढलेली लक्षवेधी नोटीस पंतप्रधान कार्यालय आपली पाळेमुळे विस्तारत असल्याचेच सूचित करणारी आहे. यापुढे चांगली इंग्रजी अवगत असलेले २० स्वीय सहायक (पीए) मोदींच्या दिमतीला राहातील. त्यांची सेवा पाच वर्षांसाठी राहील, असे सूत्रांनी सांगितले.पंतप्रधान कार्यालयाने यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या संख्येने स्वीय सहायकांची मागणी केली नव्हती. गेली कित्येक दशके पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यपद्धतीची ओळख असलेल्यांनीही याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी स्वीय सहायकांचा एवढा मोठा फौजफाटा ठेवला नव्हता, असे नमूद केले आहे. मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांना गती देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेगवान हालचाली केल्या जात असल्याचे संकेत सदर नोटिसीद्वारे मिळाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने विविध मंत्रालये आणि खात्यांच्या कामकाजावरील पकड घट्टी केली आहे. पीएमओला पाठविले जाणारे ई-मेल, पत्रे आणि संपर्कासंबंधी अन्य माध्यमांवाटे जलद प्रतिसाद दिला जावा. प्रशासकीय परिणामकारकता वाढविली जावी या उद्देशाने व्यापक बदल हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यापूर्वी कॅबिनेट मंत्र्यांनी मंजुरी मिळवावी असा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्या प्रस्तावासंबंधी मसुद्यालाही मंजुरी मिळविण्याची पूर्वअट घालण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री पंतप्रधानांसोबत अनौपचारिक चर्चा करूनच असे प्रस्ताव आणत असतात, ही वस्तुस्थिती आहे. अधिकाऱ्यांची फौज आजवर कधीही नव्हती एवढी अधिकाऱ्यांची फौज सध्या पीएमओकडे आहे. विदेश मंत्रालय जनपथ मार्गावर हलविण्यात आल्यानंतर तेथील मोठी रिक्त जागा पंतप्रधान कार्यालयाने काबीज केली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षाच्या राजवटीतील पीएमओपेक्षा मोदींचे कार्यालय पूर्णपणे वेगळे आहे. मोदींची केवळ प्रशासनावरच नव्हे तर जलद गतीने निर्णयावर पकड आहे. कान आणि डोळे गुजरातचेगुजरातमधील एक अधिकारी मोदींचे कान आणि डोळे बनला असला तरी तो स्वत:च चेहरा कधीही समोर येऊ न देता कार्यरत असतो. तो मीडियाशी कधीही बोलत नाही. प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, उप प्रधान सचिव पी.के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कोअर टीममध्ये सहभाग आहे. हिरेन जोशी, हेमांग जैन, प्रतीक दोशी, संजय आर. भावसार हेही पीएमओचे एकात्म भाग बनले आहेत. हे अधिकारी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यासोबत होते. प्रत्येक मंत्रालयात अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना पंतप्रधानांनी त्या त्या मंत्र्यांशी सल्लामसलतीची प्रक्रिया पार पाडलेली आहे. नियुक्तीसंबंधी मंत्रिमंडळ समितीचे सदस्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे केवळ नामधारी बनले आहेत. मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीलाही पीएमओची मंजुरी लागते. प्रारंभी या केंद्रीकृत यंत्रणेमुळे निर्णय घेण्यास विलंब लागत होता. आता यंत्रणेला गती दिली जात असून सरकारकडून रिक्त पदे भरली जात आहेत.