शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राजघाटावर मोदींनी महात्मा गांधीना वाहिली आदरांजली

By admin | Updated: May 26, 2014 13:12 IST

पंतप्रधानपदाच्या शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - पंतप्रधानपदाच्या शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली. त्यानंतर गुजरात भवन येथे मोदींनी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन खास सजले असून देश-विदेशांतील पाहुण्यांच्या उपस्थिती संध्याकाळी सहा वाजता मोदी देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी सार्क' देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले असून सोमवारी सकाळीच श्रीलंकेचे महिंद्रा राजपक्षें, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई, तसेच मॉरिशिअसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम भारतात दाखल झाले. तर सकाळी ११च्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे दिल्लीत आगमन झाले. मोदींच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी शरीफ भारतात आले असून त्यांच्यासोबत पत्नी व मुलगाही भारतात आले आहेत. दरम्यान आपण शांतीचा संदेश घेऊन जात आहोत, असे शरीफ यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले. या भेटीत भारतीय नेतृत्त्वाशी आपण सर्व मुद्द्यांवर चर्चा करू, असेही ते म्हणाले.