शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी स्वत:ला सर्वज्ञानी समजू लागले आहेत; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:59 IST

या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.

उदयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला सर्वज्ञानी समजतात. संरक्षण खात्यातील आपल्यालाच समजते, अर्थ खात्याविषयी आपल्या तुलनेत इतरांना काहीच कळत नाही, परराष्ट्र खात्याविषयीही केवळ आपणच सारे जाणतो, अशा पद्धतीने ते वागत आहेत. या खात्यांना मंत्री असूनही स्वत: मोदीच प्रत्येक बाबतील हस्तक्षेप करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केली.राहुल गांधी यांनी येथे उद्योजक व व्यापारी यांच्याशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. त्यांनी राज्यात तीन प्रचार सभाही घेतल्या. हिंदुत्ववाद म्हणजे काय, हेही केवळ आपल्यालाच समजते, अशी त्यांची धारणा आहे. मात्र त्यांना स्वत:ला हिंदुत्व म्हणजे काय ते कळलेले नाही. त्यांच्यापेक्षा सामान्यांना हिंदू व हिंदुत्वाची अधिक माहिती असते. त्यामुळे मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत, हेच समजेनासे झाले आहे, असा टोलाही राहुल गांधी यांना लगावला.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचेही पंतप्रधान मोदी यांनी राजकारण केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी लष्करी कारवाईचे राजकीयीकरण केले. त्याआधी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही याप्रकारे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पण डॉ. मनमोहन सिंग वा काँग्रेसने लष्करी कारवाईचे कधीच राजकारण केले नाही, अशी टीका गांधी यांनी केली.भिलवाडामधील सभेत राहुल गांधी यांनी नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे शेतकरी, गरीब व सामान्यांचे हाल झाल्याची टीका केली. या निर्णयांमुळे अनेक छोटे व मध्यम उद्योग बंद पडले आणि लाखो लोकांचा रोजगार गेला, असा आरोप राहुल गांधी यांनी सभेमध्ये केला.तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री वसुंधरा राजे अपयशी ठरल्याचे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी यापुढे लोकांना ‘मन की बात’ ऐकवण्याऐवजी जनतेच्या मनातील बात ऐकावी.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी