शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलंय, त्यांची मनं जिंकायला भाजपाला बरेच कष्ट घ्यावे लागतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 17:45 IST

2019 च्या निवडणुकीत भाजपाने हे करायला हवं.

नवी दिल्ली: गेल्या 70 वर्षांच्या काळात मुस्लिमांच्या मनात बरंच विष भिनलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला मुस्लिमांची मनं जिंकायला बरेच कष्ट घ्यावे लागतील, असे मत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले. ते रविवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी म्हटले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने मुस्लिमांना त्यांच्यासाठी सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती द्यायला हवी. तसेच तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी सरकारने कशाप्रकारे प्रयत्न केले, हेदेखील मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचले पाहिजे. एकूणच मुस्लिमांची मनं जिंकायला आम्हाला अजून बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. कारण, गेल्या 70 वर्षांच्या काळात त्यांच्या मनात कायम विषंच पेरण्यात आलं. परंतु एक गोष्ट चांगली आहे की, मुस्लीम समाजातील तरुण पिढी गुण आणि अवगूण या दोन घटकांच्या आधारेच भाजपा सरकारचे मूल्यमापन करत आहे. ही खूपच सकारात्मक बाब असल्याचे नक्वींनी सांगितले. यावेळी नक्वी यांनी कैराना लोकसभा मतदारसंघातील पराभव हा भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचा दावाही नाकारला. कैरानात पराभव झाला म्हणून आम्ही सर्व निवडणुकांमध्ये हरणार, असे होत नाही. विरोधी पक्ष आमच्याविरुद्ध एकत्र आले आहेत, ही बाब आता आम्हाला समजली आहे. त्यामुळे आता आम्ही त्यादृष्टीने रणनीती आखू, असेही नक्वी यांनी सांगितले.

टॅग्स :Muslimमुस्लीमBJPभाजपा