शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला सापडला निधी मिळवण्याचा 'महामार्ग'; तब्बल ८५ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:21 IST

सरकारचे ‘टीओटी’ माॅडेल; महामार्गापासून उत्पन्न मिळविण्याची योजना

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निधी उभारण्याची गरज आहे. ती विचारात घेऊन केंद्र सरकारने काही पायाभूत क्षेत्रांमधून उत्पन्न मिळविण्याची याेजना आखली आहे. त्यातून पुढील पाच वर्षांमध्ये ८५ हजार काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात महामार्गांच्या माधमातून १० हजार २५० काेटींचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, हे लक्ष्य गाठता आले नाही. आता चालू आर्थिक वर्षात सरकारचा १० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाची याेजना आहे. पुढील आर्थिक वर्षात २० हजार काेटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरकारला ५६६ किलाेमीटर अंतराच्या महामार्गाद्वारे ५ हजार काेटी  रुपयांचे उत्पन्न ‘टाेल ऑपरेट ट्रान्सफर‘ (टीओटी) या याेजनेतून प्राप्त झाले हाेते. ‘टीओट’ माॅडेलच्या माध्यमातून महामार्गांद्वारे उत्पन्न प्राप्त करण्याची सरकारची याेजना आहे. काय आहे ‘टीओटी’ माॅडेल?स्थावर मालमत्ता ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’कडे हस्तांतरित करण्यात येतील. त्यातून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस आमंत्रण देण्यात येईल. सार्वजनिक निधीतून पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी बाेली लावण्यात येईल. हे प्रकल्प खासगी गुंतवणूकदारांना ३० वर्षांसाठी चालविण्यास देण्यात येतील. यामुळे प्रकल्पांचे परिचालन आणि देखभाल करणे साेईचे हाेईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचाही सहभाग सरकारला कमी करायचा हेतू आहे.