शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार राजपथाचे नाव बदलणार; या नावाने ओळखला जाणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 20:23 IST

केंद्र सरकार ऐतिहासिक अशा राजपथाचे नाव बदलण्याची तयारी करत आहे.

केंद्र सरकार ऐतिहासिक अशा राजपथाचे नाव बदलण्याची तयारी करत आहे. याचबरोबर सेंट्रल व्हिस्टा लॉनचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. केंद्र सरकार या राजपथाचे नाव कर्तव्यपथ असे ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असे नाव दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेट या संपूर्ण मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. राजपथाच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल, लॉन, ग्रॅनाइट वॉकवे, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल. इंडिया गेट ते मानसिंग रोडपर्यंतच्या उद्यान परिसरात खाण्याची परवानगी दिली जाणार नाहीय. 

प्रकल्पाची गरज का भासली?  सद्य:स्थितीतील संसद भवन तसेच विविध सरकारी खात्यांची कार्यालये, मंत्र्यांची दालने, मंत्रालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांची निवासस्थाने हे सर्व अपुरे पडत आहे या सगळ्याचे बांधकाम १९२७ मध्ये एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश स्थापत्यकारांनी केले आहे. त्यामुळे या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असे संबोधले जाते काळानुरूप सध्याची बांधकामे जीर्ण आणि अपुरी आहेत. त्यामुळे नव्या संसद भवनासह संपूर्ण परिसराचे नव्याने बांधकाम करण्याचे ठरले ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली

नवीन काय? सेंट्रल व्हिस्टा  प्रकल्पांतर्गत सध्याचे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक यांचे रूपांतर संग्रहालयात केले जाईल. उपराष्ट्रपतींचे सध्याचे निवासस्थान पाडले जाईल. नवीन संसद भवनात भव्य असा कॉन्स्टिट्यूशन हॉल (राज्यघटना सभागृह) उभारला जाईल. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटनेची मूळ प्रत ठेवली जाईल. संसद भवनाच्या आवारात सर्व मंत्र्यांची नवीन कार्यालये असतील. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची निवासस्थाने असतील. काळाची गरज लक्षात घेऊन लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था असेल. डिजिटली अद्ययावत असेल नवीन संसद भवन. नवीन संसद भवन भूकंपरोधक असेल.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार