शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं 'आयुष्यमान' वाढवण्यासाठी 'मोदी केअर'पेक्षा मोठी योजना, ५० कोटी जनतेचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:22 IST

मोदी सरकारनं 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली- मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्यांसाठी मोदी केअरनंतर आता आणखी एक मोठी योजना आणणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं सार्वत्रिक सामाजिक सुरक्षितेशी संबंधित असलेल्या कामगार मंत्रालयाच्या अशा योजनेसंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा कृषी क्षेत्रात काम करणा-या कामगारांनाही फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही मोदींनी ‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजने(आयुष्यमान भारत)ची घोषणा केली होती.मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जात आहे. या नव्या योजनेंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबीयांना 5-5 लाखांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्थ आणि कामगार मंत्रालय या योजनेवर बारकाईनं काम करत आहेत. याअंतर्गत पेन्शन(डेथ व डिसएबिलिटी) आणि मॅटरनिटी संरक्षणाबरोबरच मेडिकल, आजारपण आणि बेरोजगारांनाही संरक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील कनिष्ठ वर्गातील 40 टक्के कामगारांना या योजनेला लाभ पोहोचवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित 60 टक्के योजनेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मंत्रालयानं कामगार मंत्रालयाला 'सामाजिक संरक्षण सुरक्षा कवच' यावर भर देण्यास सांगितलं आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिका-यांच्या माहितीनुसार या योजनेसाठी अर्थ मंत्रालयाचीही सहमती आहे. कामगार मंत्रालयाला वाटतं की, सरकारनं ही योजना हळूहळू सुरू करावी, तसेच सर्वात गरीब कुटुंबाला पहिल्यांदा संरक्षण द्यावं. या योजनेच्या सुरुवातीला कमी पैशांची गरज लागणार आहे. परंतु या योजनेचा विस्तार करण्यासाठी मोठी रक्कम उभारावी लागणार आहे. कशी असेल योजनासार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना ही 10 वर्षांसाठी तीन टप्प्यांत लागू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व कामगारांना संरक्षण दिलं जाणार आहे. ज्यात आरोग्य सुरक्षितता आणि निवृत्तीनंतरच्या फायद्यांचा समावेश असणार आहे. तर दुस-या टप्प्यात बेरोजगारांना फायदा पोहोचवण्यात येणार आहे. तिस-या टप्प्यात दुस-या कल्याणकारी योजना सुरू केल्या जाऊ शकतात. 50 कोटी लाभार्थ्यांना चार स्तरांमध्ये विभागले जाईल. पहिल्या वर्गात दारिद्र्य रेषेखालील लोक असतील. ज्यांना काहीही भरपाई करावी लागणार नाही. याची भरपाई केंद्र सरकार सामान्यांकडून वसूल करण्यात येणा-या करामधून करणार आहे. दुस-या स्तरात अनुदानित योजनांचा समावेश असेल. तर तिस-या टप्प्यात कामगारांचा समावेश असणार आहे. चौथ्या स्तरात संपन्न कामगारांना ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी