शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकारसमोर १.५८ लाख कोटींचं मोठं संकट; सलग दुसऱ्यावर्षी नामुष्की ओढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:58 IST

मोदी सरकारसमोर मोठं आर्थिक संकट; राज्यांसमोरच्या अडचणी आणखी वाढणार

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्याचा परिणाम महसुलावर झाला असून सलग दुसऱ्या वर्षी मोदी सरकारला राज्यांना वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) वाटा देण्यासाठी उधारी घ्यावी लागू शकते. सरकारला या आर्थिक वर्षात १.५८ लाख कोटी रुपये म्हणजेच २१.७ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त उधारी घेण्याची गरज भासू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (शुक्रवारी) जीएसटी परिषदेची बैठक होत आहे. त्यात या विषयावर चर्चा होईल. जीएसटी परिषदेची बैठक सहा महिन्यांनंतर होत आहे.मास्टरस्ट्रोक! बेरोजगार भक्तानं उघड केलं नरेंद्र मोदींच्या कामगिरीची ४२० रहस्य; ५६ पानी कोरं पुस्तककेंद्र सरकारला जीएसटीतील त्यांचा हिस्सा द्यायचा आहे. ही रक्कम २.७ लाख कोटी रुपये इतकी आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारकडे केवळ १.१ लाख कोटी रुपये आहेत. राज्यांचा महसूल बुडाल्यास त्याची नुकसान भरपाई केंद्रानं करायची अशी तरतूद जीएसटीमध्ये आहे. कोरोना संकटामुळे केंद्राला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच अतिरिक्त उधारी घेण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे.नरेंद्र मोदींच्या गणिताने वाचवले कोट्यवधी रुपये!गेल्या वर्षीदेखील केंद्रानं राज्यांकडून १.१ लाख कोटी रुपये उधार घेतले होते. आता या वर्षीदेखील केंद्राला उधारी घ्यावी लागू शकते. ही रक्कम नेमकी किती असावी आणि ती किती काळासाठी घेतली जावी याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्यांसोबत सल्लामसलत केली जाईल. त्यानंतर केंद्र सरकार निर्णय घेईल. आधी भरपाई देण्याचा अवधी २०२२ पर्यंत होता. मात्र गेल्या वर्षी केंद्रानं ही डेडलाईन पुढे ढकलली. गेल्या ७ महिन्यांपासून केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून १ लाख कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळत आहे. मात्र आता येणाऱ्या महिन्यांत त्यात घट होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बऱ्याच राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर झाल्यानं जीएसटीत घट होण्याची दाट शक्यता आहे. बार्कलेजच्या एका अहवालानुसार, दुसऱ्या लाटेमुळे देशाचं तब्बल ७४ अब्ज डॉलरचं नुकसान होऊ शकतं. बँकेनं भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात ८० बेसिस पॉईंट्सनं कपात केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ९.२ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टॅग्स :GSTजीएसटी