शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या 'या' 3 योजना गरिबांसाठी ठरतायेत वरदान, करोडो लोक घेतायेत लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:04 IST

Modi Government Schemes : मोदी सरकारच्या 3 लोककल्याणकारी योजना, ज्याचा लाभ गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक घेऊ शकतात.

नवी दिल्ली : लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मोदी सरकार सजग दिसत आहे. सरकारच्या अनेक योजना असल्या तरी मोदी सरकारच्या अशा काही योजना आहेत, ज्या अत्यंत गरीब आणि गरजूंसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. दरम्यान, जाणून घ्या, मोदी सरकारच्या 3 लोककल्याणकारी योजना, ज्याचा लाभ गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक घेऊ शकतात.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना :देशातील महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मोदी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते आणि अनुदानावर वर्षभरात 12 गॅस सिलिंडर मिळतात. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकारी अनुदान थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. 1 मार्च 2023 पर्यंत उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत. केंद्र सरकारने या योजनेच्या विस्तारासाठी एक योजनाही जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 1650 कोटी रुपये खर्चून 75 लाख नवीन उज्ज्वला एलपीजी कनेक्शन जारी केले जातील.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना : मोदी सरकारने ही योजना कोरोनाच्या काळात म्हणजेच मार्च 2020 मध्ये सुरू केली. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान ही योजना सुरू करून मोदी सरकारने देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले होते. केंद्र सरकारने या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या या योजनेचा लाभ डिसेंबर 2023 पर्यंत मिळू शकतो. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशातील 80 कोटी नागरिकांना दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिला जातो. डिसेंबरनंतरही ही योजना सुरू राहू शकेल, असे म्हटले जात आहे.

आयुष्मान भारत योजना : देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. यामध्ये औषधांचा, उपचाराचा खर्च सरकार उचलते. या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांचे उपचार आयुष्मान कार्डद्वारे सरकारने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत मिळवू शकतात. या योजनेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार 'आयुष्मान भव' मोहीम देखील चालवत आहे, ज्या अंतर्गत पात्र लोकांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जात आहेत. ही योजनाही आतापर्यंत गरिबांसाठी वरदान ठरली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी