शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा गांधी कुटुंबाला अप्रत्यक्ष धक्का?; आता परदेशातही एसपीजी सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:55 IST

राहुल गांधी परदेशात असताना मोदी सरकारकडून एसपीजीच्या नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली: मोदी सरकारनं विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे आता एसपीजीच्या संरक्षणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत न्यावं लागेल. त्यामुळे आता परदेशात जातानाही एसपीजीचं पथक व्हीव्हीआयपींसोबत असेल. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गांधी कुटुंबातील तीन सदस्यांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधींचा समावेश असेल.राहुल गांधी सध्या कंबोडिया दौऱ्यावर आहेत. नेमक्या याचवेळी मोदी सरकारनं एसपीजीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला. गांधी कुटुंबावर पाळत ठेवण्यासाठीच मोदी सरकारनं हे पाऊल उचलल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मात्र भाजपानं या आरोपाचा इन्कार केला आहे. काँग्रेस सोडून भाजपावासी झालेले दिग्गज नेते टॉम वडक्कन यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. 'अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असते. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती सुरक्षित राहतील हे पाहणं सरकारचं कर्तव्य असतं,' असं वडक्कन म्हणाले.एसपीजीच्या नियमात करण्यात आलेले बदल सुरक्षेसाठी करण्यात आलेले असून त्यामागे पाळत ठेवण्याचा हेतू नसल्याचं वडक्कन यांनी स्पष्ट केलं. त्यांना (गांधी कुटुंबाला) जिथे जायचं असेल, तिथे ते जाऊ शकतात. त्यांचं स्वातंत्र्य अबाधित आहे. मात्र त्यांच्या बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचं ते पुढे म्हणाले. सध्या राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याचं बोललं जातं. काल ते बँकॉकला असल्याची चर्चा होती. राहुल यांच्या परदेश दौऱ्यावर अनेकदा भाजपानं निशाणा साधला आहे. राहुल गांधी नेमके जातात कुठे हे त्यांनी देशाला सांगायला हवं, अशी मागणी करत भाजपानं अनेकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस