शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

मोदी सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्समधील भागिदारी विकणार; आजपासून प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 08:53 IST

ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के हिस्सा विकणार

नवी दिल्ली: केंद्र सरकार हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) आपला हिस्सा विकणार आहे. ओएफएस म्हणजे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सरकार एचएएलमधील १० टक्के हिस्सा विकणार असल्याचं वृत्त सीएनबीसी आवाजनं दिलं आहे. ओएफएससाठी फ्लोअर प्राईस १००१ रुपये प्रति शेयर इतकी ठेवण्यात आली आहे. नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ओएफएस आजपासून खुला होईल. एचएएल कंपनी नवरत्न कंपनी आहे. जून २००७ मध्ये एचएएलला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला. उत्पादन मूल्याच्या दृष्टीनं एचएएल संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल अनेक प्रकारची उत्पादनं तयार करते. याशिवाय उत्पादनाची डिझाईन्स, देखभाल, दुरुस्तीची कामंदेखील एचएएलकडून केली जातात. एचएएलनं आतापर्यंत अनेक हेलिकॉप्टर्स, विमानं आणि त्यांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती केली आहे. एचएएल संशोधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. अनेक उत्पादनांमध्ये कंपनीनं तंत्रज्ञान हस्तांतरण केलं आहे. याशिवाय लायसन्स ऍग्रीमेंटदेखील केलं आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी एचएएलची १३ कमर्शियल जॉईंट व्हेंचर्स आहेत.ओएफएस म्हणजे काय? ओएफएसला ऑफर फॉर सेल म्हणतात. शेयर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांचे प्रवर्तक आपली भागिदारी कमी करण्यासाठी ओएफएसचा वापर करतात. सेबीच्या नियमांनुसार ओएफएस जारी करू इच्छिणाऱ्या कंपनीला दोन दिवसांपूर्वी याबद्दलची सूचना सेबीसोबतच एनएसई आणि बीएसईला द्यावी लागते.यानंतर गुंतवणूकदार एनएसई आणि बीएसईला माहिती देऊन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. गुंतवणूकदार कोणत्या किमतीला शेयर खरेदी करू इच्छितात, त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते.गुंतवणूकदार आपापल्या बोली लावतात. त्यानंतर बोलींच्या एकूण प्रस्तावांची गणना केली जाते. त्यातून इश्यू किती सबस्क्राईब झाला, याची माहिती मिळते. यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अलॉटमेंटला सुरुवात होते.