शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार दरवर्षी 10 लाख तरुणांना देणार सैन्य प्रशिक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 13:59 IST

राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावण्याचा सरकारचा उद्देश

नवी दिल्ली: दरवर्षी 10 लाख तरुणांना सैन्य प्रशिक्षण देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. तरुणांमधील राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी, त्यांचं जीवन अधिक शिस्तबद्ध व्हावं, असा विचार यामागे आहे. युवा सशक्तीकरण म्हणजेच एन-वायईएस अंतर्गत तरुणांना सैन्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश यात करण्यात येईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 महिने शिष्यवृत्ती दिली जाईल. सुरक्षा दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलात भरती होणाऱ्या तरुणांसाठी हे सैन्य प्रशिक्षण आवश्यक असेल. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान कार्यालयानं या प्रस्तावित योजनेवर विचार करण्यासाठी बैठक बोलावल्याचंदेखील वृत्तात म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालय, युवक कल्याण विभाग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. तरुणांना सैन्य प्रशिक्षणासह व्यवसाय प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, योग, आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय मुल्यांची माहितीदेखील या योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी एन-वायईएसच्या अंतर्गत आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तर काहींनी या योजनेऐवजी एनसीसी आणि एनएसएसचा विस्तार करण्याचा विचार मांडला. या योजनेच्या माध्यमातून तरुणांचं जीवन अधिकाधिक शिस्तबद्ध करण्याचा, त्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लावण्याचा सरकारचा विचार आहे. देशाला विश्वगुरु करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींचं न्यू इंडिया 2022 व्हिजन साध्य करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असा विचार यामागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी