शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार बीएसएनएलवर कुऱ्हाड? कंपनी बंद करण्याचा मोदी सरकारचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:39 IST

प्रचंड कर्मचारी संख्या, रिलायन्स जिओच्या आव्हानामुळे बीएसएनएलची आर्थिक स्थिती बिकट

नवी दिल्ली: तोट्यात असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीतील गुंतवणूक काढून घेण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यास मोदी सरकारनं सुरुवात केली आहे. याशिवाय कंपनी बंद करण्याचा विचारदेखील सरकारकडून सुरू आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलचा एकूण तोटा 31,287 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता बीएसएनएल बंद करण्याबद्दल सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केल्याची माहिती मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये कंपनी बंद करण्याबद्दल चर्चा झाल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. या बैठकीत बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दूरसंचार सचिवांसमोर एक प्रेझेंटेशन दिलं. यामधून कंपनीच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात आली. यात कंपनीचा एकूण आर्थिक तोटा, रिलायन्स जिओच्या आगमनामुळे झालेला परिणाम यासह कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्ती संदर्भातील आकडेवारीचा समावेश होता. एका बाजूला सरकारकडून बीएसएनएलला नवसंजीवनी देण्याचा विचार व्यक्त करण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूला सरकारकडून कंपनी बंद करण्याचा विचारदेखील सुरू आहे. उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा तुलनात्मक विचार करा, अशा सूचना बीएसएनएलला सरकारकडून देण्यात आल्या. प्रतिस्पर्धी कंपन्यांसह कर्मचाऱ्यांची प्रचंड संख्यादेखील मोठी समस्या असल्याचं बीएसएनएलच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितलं. ही संख्या कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचं वय 60 वर्षांवरुन 58 वर्षे करण्यात यावं, यावर बैठकीत चर्चा झाली. '2019-20 पासून स्वेच्छानिवृत्तीचं वय कमी कमी केल्यास, कंपनीचे 3 हजार कोटी रुपये वाचतील,' अशी आकडेवारी बीएसएनएलनं दिली.  

टॅग्स :BSNLबीएसएनएलNarendra Modiनरेंद्र मोदी